Rohit Pawar, Raj Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar: राज ठाकरे महायुतीत आले तर...रोहित पवार म्हणाले...

Maharashtra Politics: जनतेच्या मूळ प्रश्नावर ते बोलतात

Mangesh Mahale

Nagar: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (मंगळवारी) मनसे नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत मनसेला स्थान मिळणार अशा चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे एक शिष्ट मंडळ यांच्यात बैठक झाली. बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे लोकसभेला इंडिया आघाडीबरोबर आले तर तुम्ही त्यांचे स्वागत करणार का यावर रोहित पवार म्हणाले, " शंभर टक्के आम्ही त्यांचे स्वागत करू. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा संविधान टिकवण्याच्या भूमिकेसाठी आमच्याबरोबर येण्याचे कबूल केले आहे. येत्या काळामध्ये जर राज ठाकरे आमच्यावर आले आणि सर्वच पक्षांना ते मान्य असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करू."

"राज ठाकरे यांची भूमिका आम्हाला भावली, मात्र आम्ही असे म्हणत नाही की भाजपा विरोधात बोलतात म्हणून त्यांचे भाषण आम्हाला भावले. जनतेच्या मूळ प्रश्नावर ते बोलत असतात. राज ठाकरे आता काय भूमिका घेतात हे आता पाहवे लागेल, मात्र त्यांचे जे ट्विट असतात जे वक्तव्य असतात ते सर्व भाजपच्या विरोधातच राहिलेले आहेत. जनतेच्या बाजूने राहिलेले आहे, अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आपली भूमिका बदलतात का महाराष्ट्राच्या स्वाभिमान ठेवतात हे आपल्याला पाहावे लागेल. ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि जनतेबरोबर राहिले तर आम्ही कार्यकर्ते आणि नागरिक म्हणून त्यांचे नक्कीच स्वागत करू," असे रोहित पवार म्हणाले.

मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास त्यांची भेट झाली. मात्र ही भेट सदिच्छा भेट होती, असे मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणूकिसाठी चर्चादेखील झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT