Jitendra awhad sharad pawar ajit pawar
Jitendra awhad sharad pawar ajit pawarSarkarnama

Maharashtra Politics: शरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट रचला जातोय; अजितदादा अन् गँग...

Sharad Pawar: पवारांना यातना देणं अजितदादांना शोभत नाही.
Published on

New Delhi:"शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा कट रचला जातोय, त्यामागे अजित पवार अन् गँग आहे, पवारांना यातना देणं अजितदादांना शोभत नाही. शरद पवारांना राजकीयदृष्टया संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे," अशी संतप्त भावना शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. शरद पवार गटाचे नेते संतप्त झाले आहे. आव्हाड म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निकाल संशयास्पद आहे. आयोगाने निकाल देताना घोटाळे केले आहेत.आयोग खोटं बोलत आहे,"

Jitendra awhad sharad pawar ajit pawar
Kolhapur Politics : संभाजीराजे कोल्हापूरच्या मैदानातच ठोकणार शड्डू, वरिष्ठ पातळीवर चर्चा?

"शरद पवारांच्या राजकीय उंचीबाबत अजितदादांनी यापूर्वी काय सांगितले त्यांचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आम्ही महापत्रकार परिषद घेणार असून आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ," असे आव्हाड यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने कालचा जो निर्णय आहे, तो पाहिल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. अजित पवार यांची निवड ही चुकीची आहे,असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पण हे सांगताना त्यांनी 2019 ला अजित पवार फुटले तेव्हापासून वाद सुरू झाला असं सांगितलं आहे. तेव्हा काकांनी (शरद पवार) मोठे मन दाखवत 2019 ला फुटल्यानंतरही कुशीत घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवत उपमुख्यमंत्री केले. मग यात वाद कुठे होता? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

आज सांयकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाला पर्याय दिले होते, यासंदर्भात आमच्याकडे पुरावे आहेत, मात्र तरीही निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे, असे आव्हाड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com