Ahilyanagar political news : अहिल्यानगर मनपातील 778 रस्त्यांचा सुमारे 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्यावरून मुंबईपासून ते अहिल्यानगरपर्यंत चांगलच वातावरण तापलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार संग्राम जगताप यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर 'ईडी' प्रकरणावरून पलटवार करत टीका केली.
आमदार जगतापांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे पक्षाचे अहिल्यानगरचे शहरप्रमुख किरण काळेंनी खासदार राऊत लिखित "नरकातला स्वर्ग" पुस्तक आणि आमने-सामने चर्चेला येण्यासाठी पत्र पाठवले.
शहरप्रमुख किरण काळे म्हणाले, "राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जगताप यांना पत्र पाठवत या घोटाळ्यावर आमने-सामने चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार, घोटाळा न झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहात". आपण लवकरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या पुतळ्यासमोर लोकार्पण करणार आहात. याचवेळी त्यांनी त्यांच्याकडील पुरावे घेऊन यावेत. मी माझ्याकडील ढीगभर पुरावे आणतो. येताना आपली प्रवक्तेगिरी करणाऱ्या आयुक्त यशवंत डांगे यांनाही आणावे. तारीख, वेळ आपणच कळवावी, असेही पत्र म्हटल्याचे काळे यांनी सांगितले.
बनावट आयटी पार्कबद्दल देखील यापूर्वी चर्चेचे निमंत्रण दिल्याची आठवण काळे यांनी करून दिली. शहर शिवसेनेने दिलेले हे निमंत्रण जगताप स्वीकारतात की नाही हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. 'राज्यातील हुकूमशाही, दडपशाहीला न जुमानता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लिहिलेले "नरकातला स्वर्ग" पुस्तक जरूर आपण वाचावे, असे म्हणत, "तुम्ही अहिल्यानगरचा नरक केला" असा टोला किरण काळे यांनी लगावला आहे.
खासदार राऊत यांना सुडाच्या राजकारणातून ईडीने अटक केली होती. अटक केलेल्या 100 दिवसांत राऊत यांना शरण येण्याच्या अनेक ऑफर दिल्या गेल्या. पण हे क्रांतिकारी नेतृत्व तुमच्या भ्रष्ट महायुतीपुढे, मोदी, शाह यांच्यापुढे झुकलं नाही. तुरुंगातही त्यांची लेखणी थांबली नाही, याची आठवण देखील किरण काळे यांनी करून दिली.
'खासदार राऊत हे कधीही भ्रष्टाचार, हत्याकांड, एसपी ऑफीस हल्ला, ताबेमारी, गुंडगिरी, दहशत, दादागिरी अशा कोणत्या ही प्रकरणांमध्ये सहभागी नाहीत. मात्र अशी कृत्य करणाऱ्यांचा कर्दनकाळ आहेत. म्हणूनच या राज्यात "सौ दाऊद पर, एक राऊत भारी" अशी म्हण प्रचलित झाली आहे', असे किरण काळे यांनी म्हटले.
किरण काळे यांनी तुरुंगवारीवरून डिवचताना, शिवसैनिकांच्या केडगाव इथल्या दुहेरी हत्याकांडाचा आरोप, यानंतर झालेला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला गेला. याबद्दल गुन्हा दाखल असून चार्जशीट देखील न्यायालयात दाखल असल्याची आठवण करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.