Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यांवर आक्रमक झालेले आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर नामांतराला विरोध करणार्यांना लोकांना 'जिहादी' म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी दाखल याचिकेवर प्रशासनाने सक्षम बाजू मांडावी, अशी आपेक्षा व्यक्त करताना, निवेदन दिले.
आमदार संग्राम जगताप गेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या (Hindu) मुद्यावर आक्रमक आहे. कर्जतमधील सिद्धटेक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात आयोजित सकल हिंदू मोर्चात सहभागी होत, अतिक्रमणावर हातोडा चालवला.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिर्डीत नवसंकल्प शिबिर होते. तिथं हजेरी लावताना, आमदार संग्राम जगताप यांनी शिर्डीच्या श्रीसाईबाबा संस्थान मंदिराच्या परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या उत्पन्न संस्थानकडे जमा करावे, तेथील उत्पन्ना खासगी व्यक्ती घेत असल्याचा आक्षेप घेतला होता.
'अहिल्यानगर नामांतर विरोध करणारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यावर आमदार संग्राम जगताप आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेनं आहिल्यानगर नामांतर केले आहे. तरी देखील नामांतराला विरोध का? असा सवाल करताना, ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर प्रशासनाच्यावतीने सक्षमपणे उत्तर द्यावे', अशी अपेक्षा व्यक्त करणारे निवेदन आमदार संग्राम जगताप यांनी दिले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, "अहिल्यानगर नामांतराचा सकल हिंदू समाजाने स्वीकारले आहे. स्थानिक जनतेची भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर कायम राहावे. यासाठी न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी". काही 'जिहादी' लोक यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. यांच्या घरासमोरही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.
लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली आहे. पहिलीच सुनावणी 25 जुलै 2024 रोजी झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.