MNS leader Rakesh Bhamre
MNS leader Rakesh Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा राजकीय तमाशा

Sampat Devgire

मालेगाव : मालेगाव (Malegaon) महापालिकेच्या आगामी निवडणुका (Cprporation elections) डोळ्यासमोर ठेवून शहरात गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय तमाशा सुरू आहे. माजी आमदार आसिफ शेख (Ex Mla Asif shaikh) हे शिवसेनेची (Shivsena) युती असल्याचे सोयीस्करपणे विसरले आहेत, अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष राकेश भामरे (Rakesh Bhamre) यांनी केली आहे.

श्री. शेख यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करावे. निरर्थक आरोप केल्यास मनसे जशास तसे उत्तर देईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

श्री. भामरे म्हणाले, कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेल्यांची राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यातूनच शहराची शांतता धोक्यात आणून जातीयवादी राजकारण करण्यात येत आहे. पक्षनेते राज ठाकरे यांचा अजानला विरोध नाही तर अजानच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन अधिक आवाजात वाजविण्यात येणाऱ्या भोंग्यांना आहे.

ते पुढे म्हणाले, शहरात सर्रासपणे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. रमजानची संधी साधून माजी आमदार आसिफ शेख यांनी घाणेरडे राजकारण सुरु केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. मुस्लिम बांधवांच्या भावनांशी खेळून राजकीय पोळी भाजण्याचा जे प्रयत्न करत आहेत. त्यांचा खरा चेहरा उघड करु, असा इशारा श्री. भामरे यांनी दिला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT