CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Politics: अजित पवारांच्या शपथविधीने मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेंची कोंडी?

Sampat Devgire

NCP Rebellion : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे निश्चित झाले आहे. हा राजकीय डाव म्हणजे भाजपने एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar`s movement is big political setback for CM Eknath Shinde)

राज्याच्या (Maharashtra) राजकारणात आज मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या बहुतांश आमदारांसह भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे राजकीय महत्त्व संपुष्टात आणण्याचा डाव असल्याची चर्चा आहे.

आज झालेल्या राजकीय घडामोडींचा मोठा परिणाम राज्याच्या आणि नाशिकच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, सरोज अहिरे हे तीन आमदार दिसून आले. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हे दोन आमदार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आज राजकारणाने जे वळण घेतले, त्यात गेले काही दिवस एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत विविध निर्णयांमुळे जो वाद सुरू होता, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे काम केल्याची चर्चा आज राजभवनावर गेलेल्या नाशिकच्या छगन भुजबळ समर्थक पदाधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानी शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.

जिल्ह्यातील भुजबळ समर्थक नेत्यांना आज सकाळी याबाबत मुंबईला येण्याचा निरोप दिला होता. तेव्हाच आज मोठी घडामोड होणार याची चर्चा सुरु होती. दुपारपर्यंत त्यातील सर्वच स्पष्टीकरण झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT