Maharashtra Politics : मोठी बातमी : अजितदादा, फडणवीस राजभवनात दाखल ; भुजबळ वेगळा निर्णय घेणार ..

Ajit Pawar News Update : अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ?
Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

RajBhavan : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याचे चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार हे सत्तेत सामील होणार की सरकारला पाठिंबा देणार, हे लवकरच समजेल. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भुजबळ हे भाजपसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोघांसह शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी लवकरच होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली, अजितदादांसोबत ३५ आमदार : नऊ आमदार मंत्री होणार..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात या बैठकीबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी मला या बैठकीबाबत माहित नाही, असे पवार म्हणाले. अजित पवार यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी येत्या सहा जुलै रोजी बैठक बोलावली आहे,

अतिजदादांनी आज (रविवारी) आपल्या 'देवगिरी'बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली होती. बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर महत्त्वाची चर्चा होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी प्रमुख नेतेही देवगिरीवर हजर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com