Dindori Constituency Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Constituency 2024: शरद पवारांना धक्का, जे. पी. गावित बिघडवणार 'दिंडोरी'चे गणित

Sampat Devgire

NCP CPM Politics News : इंडिया आघाडीचा घटक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये असंतोष आहे. दिंडोरी मतदारसंघातून जे. पी. गावित J P Gavit यांनी अपक्ष उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गणित बिघडू शकते.

महाविकास आघाडीने MVA दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला NCP सोडण्यात आली आहे. या मतदारसंघात भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भगरे यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचार सुरू केला आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या भगरे यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाराष्ट्रात हिंगोली हा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. मात्र, माकपचे नेते जे. पी. गावित J P Gavit दिंडोरी मतदारसंघासाठी आग्रही होते. ही मागणी मान्य न झाल्याने ते नाराज आहेत. सुरुवातीला त्यांची समजूत काढण्यात आली होती. पक्षाच्या पॉलिट ब्युरोकडून हा विषय संपविण्यात आला होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावित पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी पेठ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आज सायंकाळी ते दिंडोरीत मेळावा घेणार आहेत. या वेळी निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी करण्यात येईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे.

माकपचे गावित हे सुरगाणा कळवण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करतात. लगतच्या अन्य मतदारसंघातून आदिवासी भागातून त्यांना सुमारे एक लाख मते मिळतात. यापूर्वीदेखील त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी केली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP पराभवाला कारणीभूत ठरली होती. सध्या या मतदारसंघात कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय जनता पक्ष विरोधात वातावरण आहे. अशा स्थितीत गावित यांनी उमेदवारी केल्यास त्यातून मत विभागणीचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे गावित यांच्या हालचाली या राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाला Sharad Pawar मोठा धक्का आहे.

सध्या दिंडोरी मतदार संघात Dindore Matdarsangh भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार Bharamti pawar उमेदवार आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षातील बंडखोरीचा धोका आहे. पक्षामध्ये समन्वय नसल्याने त्यांचा अद्याप प्रचारात जाऊन बसू शकलेला नाही. या स्थितीत माकपचे जे. पी. गावित यांची उमेदवारी त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे माकपच्या वरिष्ठ नेत्यांपासून तर महाविकास आघाडीतील पदाधिकारी गावित यांचे मनधरणी करण्यासाठी धडपडत आहेत. एकंदरच गावित यांच्या हालचाली पाहता दिंडोरी लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित विस्कटू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT