Sanjay Raut: राऊतांनी राणांना पुन्हा हिणवलं; नटीला नटी नाही तर काय म्हणणार? गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की...

Sanjay Raut Controversial statement: 'नटीला नटी नाही म्हणणार तर काय म्हणणार?' असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Navneet Rana, Sanjay Raut
Navneet Rana, Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut On Navneet Rana: 'नटीला नटी नाही म्हणणार तर काय म्हणणार?' असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचार सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती.

राऊतांच्या या टीकेनंतर भाजपकडून (BJP) राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, एवढं सगळं होऊनसुद्धा राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण त्यांनी आज पुन्हा एकदा 'नटीला नटी नाही म्हणणार तर काय म्हणणार?' असा प्रश्न चक्क जयंत पाटलांसमोर उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी भेट घेतली. या वेळी जयंत पाटलांशी (Jayant Patil) चर्चा करत असताना संजय राऊत यांनी नवनीत राणांबद्दल (Navneet Rana) बोलताना म्हणाले, "आता नटीला नटी म्हणणार नाही तर काय म्हणणार? नटीच म्हणणार ना, ती डान्सर आहे. आम्ही गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की," असं म्हणत मला एक्ट्रेस म्हणायला मला इंग्लिश येत नाही, अशी सारवासारव राऊतांनी या वेळी केल्याचं दिसून आलं. तर राऊतांच्या या भूमिकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Navneet Rana, Sanjay Raut
Sanjay Raut News : नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...

राऊतांनी नेमकं काय म्हटलं होतं?

अमरावतीतील (Amravati) प्रचार सभेत बोलताना राऊत म्हणाले, "ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे." याच सभेत बोलताना राऊत म्हणाले, ज्‍या बाईने हिंदुत्‍वाविषयी अपशब्‍द वापरले, मातोश्रीला आव्‍हान देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्‍य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असलं पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आहे हे लक्ष्यात ठेवा, असं आवाहन राऊतांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com