Bharti Pawar Vs Bhaskar Bhagre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bharti Pawar Vs Bhaskar Bhagre: गावित फॅक्टर निकाल फिरवणार: कांदा कुणाला रडवणार भास्कर भगरे की भारती पवारांना...

सरकारनामा ब्यूरो

JP Gavit News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक प्रमुख फॅक्टर आहे. यंदा पहिल्यांदाच या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याची आकडेमोड सुरू आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) या पिछाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांदामय निवडणूकीचा कौल अधांतरी असला तरी 75 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, कांदा कुणाला रडवणार हे काही तासातच समजेल. यंदा परिस्थिती आणि राजकीय स्थिती दोन्हीही अनुकूल झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीला यश मिळेल का? हे गावित फॅक्टर ठरू शकतो.

गेल्या तिन्ही निवडणुकीत (२००९, २०१४ आणि २०१९) दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेले नाही. आता, तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी अगदी उमेदवारीपासून प्रचारापर्यंत मतदारसंघ सर करण्यासाठी जोर लावला. त्यामुळे यंदा तरी, शरद पवारांना हा मतदारसंघ साथ देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या पाच निवडणुकांमध्ये माकप च्या उमेदवाराला सरासरी एक लाख मते मिळाली आहेत. यंदा राष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा मोठा लाभ होऊ शकतो.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagree) यांच्या थेट लढत होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी ताकद लावली होती.

दिंडोरी मतदार संघात १९९९ ते २०१९ या पाच निवडणुकांमध्ये आपला उमेदवार दिला होता. १९९९ मध्ये चिंतामण गावित यांना ६१,१४२, २००४ मध्ये जेपी गावित यांना एक लाख १९ हजार ४३६, २००९ मध्ये जेपी गावित यांना एक लाख ५ हजार ३५२, २०१४ मध्ये हेमंत वाघेरे यांना ७२, हजार ७२४ आणि २०१९ मध्ये जेपी गावित यांना एक लाख नऊ हजार ५७० अशी मते मिळाली आहेत.

दिंडोरी मतदार संघातील आदिवासी पट्ट्यात या पक्षाचा विशेष प्रभाव आहे. यंदाही माजी आमदार जेपी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राजकीय वाटाघाटी द्वारे त्यांनी माघार घेतली.

गावित यांनी पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर भगरे यांना ही एक लाख मते वर्ग होऊ शकतील. तसे झाल्यास भगरे यांचा विजय सोपा होणार आहे. त्यामुळे दिंडोरी मतदार संघाच्या निकालावर गावित फॅक्टर प्रभाव टाकणार हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT