Dharashiv Lok Sabha Constituency 2024: लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर विजयाचा कौल मिळालेल्या उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष सुरु झाला आहे. मतदारसंघात विजयाचे बॅनर झळकत आहेत.
धाराशीव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे जागजी हे आजोळ. लोकसभेच्या निकालापूर्वीच जागजी ग्रामस्थांनी पेढे वाटण्यास सुरवात केली आहे.'ओमराजेंनी केलेली कामे व त्यांचा असलेला जनसंपर्क त्यामुळे ओमराजेंच निवडून येणार,' असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. मामाचे गाव असलेले जागजीमध्ये त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.
'ओमराजे निंबाळकर यांची पुन्हा एकदा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन,' अशा आशयाचा मजकूर बॅनरवर आहे. भाच्याच्या विजयाचा (ओमराजे) आनंद गावकरी पेढे आणि लाडू वाटून साजरा करीत आहेत.
महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यासोबत ओमराजे यांची (Omraje Nimbalkar) चुरशीची लढत झाली. अर्चना पाटील यांच्याविरोधात काल (शनिवारी) आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले? असा सवाल ओमराजे यांनी प्रशासनाला विचारला आहे.
सत्ताधारी पक्षातील उमेदवार आहेत, म्हणून कारवाई करायला दिरंगाई केली जात असेल तर आचारसंहिता ठेवली कशाला? एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून याचा जाब प्रशासनाला विचारणार, असे ते म्हणाले. प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली काम करते हे दुर्दैवी आहे, प्रशासनाने पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे. अर्चना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.