Nashik Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सध्या पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर भर दिला आहे. शहरात अल्पसंख्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी यापुढील काळात पदाधिकारी काम करणार आहेत.(NCP appoints Tousif Maniyar as District Minority President)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या नाशिकच्या (Nashik) दौऱ्यात तौसिफ मणियार यांची पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शहर व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून विस्तारावर भर देण्याच्या सूचना या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
धोरण म्हणून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यावर श्री. पाटील यांनी सध्या भर दिला आहे. त्यात तौसिफ मणियार यांची नियुक्ती करताना शहर व जिल्ह्यात पक्षात्या विस्ताराचे काम करताना नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
तौसिफ मणियार यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य कुटूंबातील एका लहान कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली आहे. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ द्यावी अशा सुचना देखील पाटील यांनी दिल्या. पक्षाने राबविलेल्या अभिप्राय अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता. त्यात मनियार यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यासाठी पक्षाध्यक्ष पवार यांनी त्यांना पुरस्कार दिला होता.
नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, ज्येष्ठ नेते श्रीरामजी शेटे, दत्तात्रय पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, शाम हिरे, भास्कर भगरे आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.