Rohini Khadse - Supriya Sule - Chitra Wagh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohini Khadse On Wagh : खासदार सुळेंवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक; रोहिणी खडसेंनी घेतली चित्रा वाघांची शाळा

NCP Vs BJP Political News : "...तर तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो?"

कैलास शिंदे

Jalgaon Political News : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात 'ट्विटर वॉर' सुरू आहे. आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

आता या वादात शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, मेधा कुलकर्णी, पूनम महाजन या महिला नेत्यांचे दाखले देत भाजपमध्ये महिलांवर कसा अन्याय होत आहे, याचा पाढाच वाचून दाखवला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी (Rohini Khadse) ट्विट करत चित्रा वाघांच्या टीकेवर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर महिलांवर अन्याय होत असता, तर तुम्हाला राज्याचे प्रमुखपद तरी दिले असते का हो? उगाच टीका करायची म्हणून काहीही करू नका ताई. अशानं हसे होते बरं का... असा निशाणा त्यांनी वाघ यांच्यावर साधला.

रोहिणी खडसे ट्विटमध्ये काय म्हणाल्या ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या, "अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांना मान सन्मान दिला जातो हे तुम्हाला कुणी सांगितलं बरं? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला माहीत आहे काय आहे.

बरं ठीक, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हटले तर, मग आदरणीय पंकजाताईवर अन्याय कशासाठी सुरू आहे हो?, जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना. केवळ त्याच नाही तर ज्यांनी पक्ष वाढविला, तळागाळात पोहाेचविला त्या प्रमोदजी महाजन यांच्या कन्या खासदार पूनमताई महाजन सध्या कुठेच दिसत नाहीत, असाही हल्लाबोल खडसे यांनी केला.(Supriya Sule)

...तर वसंधुरा राजेंना विचारा, अन्याय काय असतो ते!

रोहिणी खडसे म्हणाल्या, पुण्यातल्या मेधाताई कुलकर्णींचे काय? त्यांची जागा चंद्रकांतदादांनी हिसकावली, नंतर त्यांच्या हातावर अक्षता देण्यात आल्या, हा त्यांच्यावर अन्याय नाही का? बरं राज्यापुरतेच हे मार्यादित नाही बरं का, चित्राताई...अगदी दिल्लीतदेखील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्यावरही अन्यायच झाला आहे.

तुम्हाला माहितीच घ्यायची ना? तर वसंधुरा राजेंना विचारा अन्याय काय असतो ते..अगदीच झालं तर आदरणीय सुमित्राताई महाजन यांनाही विचारा की, पक्षात अन्याय कसा असतो ते.... राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर इथे जर महिलांवर अन्याय होत असता तर ‘तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो?’ उगाच टीका करायची म्हणून काहीही करू नका ताई. अशानं हसे होते बरं का, असे प्रत्युत्तर रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघांना(Chitra Wagh) दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT