Sharad Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या? नाशिकमधून शरद पवार कडाडले; म्हणाले, आता आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही'

NCP SP Nashik Akrosh Morcha : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Aslam Shanedivan

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक शहरात भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला

  2. शेतकरी आत्महत्या कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात आला

  3. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना इशाराही दिला आहे

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील नाशिक शहरात आज भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चातून जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्यात झालेल्या 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून टीकास्त्र सोडले. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाणाला लक्षात घेऊन, कर्जमाफीची घोषणा करा अशी मागणी करत थेट इशाराच दिला आहे. तसेच याची सुरूवात आम्ही नाशिकमधून करू असे म्हणत आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असेही म्हटलं आहे.

पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतीमालाचे हमीभावा या प्रश्नांवर भव्य मोर्चा काढला. या मोर्चाच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी, महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्यातच राज्यातला शेतकरी जीव देताना दिसत आहे. पण हे का होतयं हे न समजता, कारण न शोधता संकटावर मार्ग काढायचं सोडून सरकार हात झटकत आहे. शेतकऱ्यांच्या संकटांवर मार्ग काढण्याची जबाबदारी ही राज्य आणि केंद्र सरकारची असते. मात्र सरकार ढुंकूनही या प्रश्नाकडे बघत नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

राज्यातला शेतकरी हा कर्जमाफीची वाट पाहत असून तो आताही अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. कर्जमाफी नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचेही शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली असून गेल्या दोन महिन्यांमध्ये दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तातडीने घोषणा करावी. तसे न केल्यास स्थिती गंभीर होईल, असाही इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.

या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाला लक्ष वेधताना शरद पवार म्हणाले, मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असून कर्जामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आता सरकारने वेळ काढूपणा करू नये. लवकर निर्णय घ्यावा. आता आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. कर्जमाफीची कार्यवाही आठ दिवसात सुरू न केल्यास याची सुरूवात आम्ही नाशिकमधूनच करू. याच्यापेक्षा मोठे शक्ती प्रदर्शन करू, असाही इशारा शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.

शरद पवार यांनी आपण कृषीमंत्री असतानाची एक आठवण सांगितली. त्यांनी, आपण कृषीमंत्री असताना, शेतकरी आत्महत्येची घटना वाचनात आली होती. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांना मी या आत्महत्येच्या घटनांची माहिती दिली होती. तसेच शेतकरी जीव का देतो? हे समजून घेण्याविषयी विनंती केली होती. तर विनंती करताना या आत्महत्यांचे कारण जाणून घेण्यासाठी दिल्ली सोडावी लागेल. शेतकऱ्यांशी भेटावे लागेल असे सांगितले होते. त्यांनी यानंतर तयारी दाखवत जिल्ह्यांना भेटी देण्याचे नियोजन करण्याचे सांगितले.

त्याप्रमाणे ते आणि मी नागपूर, अमरावती, यवतमाळला गेलो होतो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबांशी भेटी घेतल्या. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्याची बायको ढसाढसा रडली, आत्महत्येचं कारणही सांगितलं. सोसायटीचं कर्ज, खासगी सावकाराचं कर्ज यामुळे शेतकरी पिचला होता. कर्जाच्या वसूलीसाठी सावकारानं घरातील भांडीही नेली. यामुळेच मालकानं जीव दिला असंही शेतकऱ्याची बायको म्हणाल्याचे शरद पवार म्हणाले. यावेळी कर्जबाजारीपणा हा मोठा रोग असून त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. म्हणून आम्ही 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचेही शरद पवार म्हणाले.

FAQs :

प्र.1: राज्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?
उ.1: गेल्या दोन महिन्यांत 2000 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

प्र.2: शरद पवार यांनी कोणाला इशारा दिला?
उ.2: जेष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या आणि इतर कारणावरून महाराष्ट्र सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

प्र.3: शेतकरी आत्महत्या वाढण्याचे नेमक कारणं काय आहे?
उ.3: शेतीतील नुकसान, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT