Ex MLA Sanjay Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Election Commission Vote Theft: माजी आमदार संजय चव्हाण यांचा धक्कादायकआरोप, गुजरातहून होती ऑफर...५ कोटींत दीड लाख मतं सेट करतो!

NCP SP Leader Sanjay Chavan: A person from Bhuj (Gujrat) given offer for EVM setting for 1.50 lacs votes-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार, माजी आमदार संजय चव्हाण यांना गुजरातच्या व्यक्तीने मतदानासाठी ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केला.

Sampat Devgire

Election Commission vote Theft News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर देशभरात अशा स्वरूपाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. सटाणा येथील माजी आमदार संजय चव्हाण याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार दीपिका चव्हाण विधानसभेच्या उमेदवार होत्या. या मतदारसंघात भाजपचे आमदार दिलीप बोरसे निवडून आले आहेत. या दोन्ही उमेदवांरांत निवडणूकीत मोठी चुरस होती.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले होते. मतदारयाद्यांमध्ये बनावट नावांची नोंदणी करण्यात आली. खोटे मतदार नोंदविण्यात आले. भाजपच्या गैरसोयीचे मतदार वगळण्यात आले. त्याद्वारे भाजपला मदत होईल असे काम आयोगाने केल्याचा आरोप होता.

ईव्हीएमद्वारे निवडणूक ‘मॅनेज’ करून निकाल आपल्या बाजूने वळवता येतो का, या विषयावरून देशभरात राजकीय वादंग सुरू असताना, बागलाण विधानसभा निवडणुकीदरम्यान गुजरातमधील एका व्यक्तीने तब्बल पाच ते आठ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ५० हजार ते दीड लाख मतं ‘सेट’ करून उमेदवार दीपिका चव्हाण यांचा विजय सुनिश्चित करण्याचा प्रस्ताव मिळाल्याचा सनसनाटी खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, यामुळे बागलाणच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबत बोलताना माजी आमदार श्री.चव्हाण म्हणाले, बागलाण विधानसभा निवडणूक काळात भुज (गुजरात) येथील आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणवणार्‍या नारायणदास पटेल याने आमच्याशी संपर्क साधला. “आम्ही तुमच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना विजयी करून देऊ. त्यासाठी तुम्ही पाच कोटी रुपये द्या,” अशी त्याची थेट ऑफर होती.

हा प्रस्ताव ऐकल्यानंतर आम्ही ताबडतोब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती दिली. पाटील यांनी या प्रकारास स्पष्ट नकार देत, “असे काहीही होत नाही, सर्व सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. आपण जनतेसमोर प्रामाणिकपणे जाऊ, जनता जो कौल देईल, तो स्वीकारू. विजय आपलाच होईल,” असा सल्ला दिला.

या पार्श्वभूमीवर आम्ही ‘सेटिंग’चा प्रस्ताव फेटाळला आणि प्रचारात लक्ष केंद्रित केले. मात्र, नारायणदास पटेल इतक्यावर थांबला नाही. त्याने उमेदवार दीपिका चव्हाण यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क न झाल्यावर पटेलने पुन्हा माझ्याशी संपर्क करून, “तुम्ही जितके जास्त पैसे द्याल, तितक्या मतांची आम्ही सेटिंग करू. पाच ते आठ कोटी रुपयांत ५० हजार ते दीड लाख मतं मिळवून देऊ. न दिल्यास आम्ही भाजप उमेदवार दिलीप बोरसेंना हिच ऑफर देऊन त्यांना विजयी करू.” असे सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मत चोरी’ झाल्याचा आरोप नुकताच केला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही दिल्लीत दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेऊन निवडणूक मॅनेज करण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. माजी आमदार चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर आरोप केला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT