Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar In Nashik : शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना 'चॅलेंज'; म्हणाले, "सर्व यंत्रणांचा वापर करून..."

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Nashik Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवारांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यावेळी अजित पवारांसह इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केली. या मेळाव्यात शरद पवारांनी फुटीरांवर बोलण्यापेक्षा पुन्हा एकदा जनतेत जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याची सुरुवात शनिवारी (ता. ८) नाशिकमधील येवल्यातून करण्यात आली आहे. (Latest Political News)

यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली म्हणून शरद पवार यांनी नाशिककरांची माफी मागितली. पवार म्हणाले, "आता कुणावरही टीका करणार नाही. नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यापासून साथ दिली. यावेळी मात्र उमेदवाराबाबत माझा अंदाज चुकला. मी केलेल्या चुकीबाबत तुमची माफी मागतो. अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाहीही देतो."

यानंतर त्यांनी फुटीरांबाबत वक्तव्य करताना पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. राज्यात जी अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे घोटाळेबाज असतील त्यांना तुरुंगात टाका, असेही आव्हान देत पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.

शरद पवार म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रसमधील नेत्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आपल्या नेत्यांनी जो घ्यायचा तो निर्णय घेतला. मात्र मोदींना सांगतो की तुम्ही सर्व यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची चौकशी करा. यात जो कुणी आरोपी सापडला तर त्यांना तुरुंगात टाका."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT