Sharad Pawar - Bhujbal
Sharad Pawar - BhujbalSarkarnama

Sharad Pawar On Bhujbal : शरद पवारांचा भुजबळांवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून तिखट वार, म्हणाले, '' माझा अंदाज चुकत नाही, पण...''

Ncp Political News : ''आतापर्यंत कितीही संकटं आली तरी इथल्या जनतेने कधीही साथ सोडली नाही...''
Published on

Yeola : '' मी इथं का आलो आहे. तर कुणावर टीका करण्यासाठी नाही किंवा कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही. पण माझा अंदाज इथं चुकला. म्हणून माफी मागण्यासाठी मी इथं आलो आहे. माझा विचारांवर तुम्ही निकाल घेतले. आणि तुम्हांला माझ्यामुळे यातना झाल्या असतील तर माझं तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य आहे'' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून हल्लाबोल केला.

शरद पवार(Sharad Pawar) हे येवला येथे शनिवारी( दि.८) सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार उपस्थित होते. पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यानं आत्तापर्यंत पुरोगामी विचारांना साथ दिली त्यात नाशिक जिल्ह्याचं नाव घ्यावं लागेल.कितीही संकटं आली तरी इथल्या जनतेने कधीही साथ सोडली नाही असंही पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar - Bhujbal
Amol Kolhe News : 'ये तो सिर्फ ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!' अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

पवार म्हणाले, माझं वय झालं. तुम्ही आता निवृत्त व्हा. वय ८२ वर्ष आहे हे खरं आहे. पण गडी काय हे तू कधी पाहिलं कुठं. जास्त काही सांगण्याची गरज नाही. वयावर याल तर याद राखा असा कडक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार(Ajit Pawar)यांना दिला आहे.

काही चुकीच्या घटना घडल्या असतील त्या दुरुस्त केल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका भाषणात काँग्रेससह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरव आरोप केले. एक अध्यक्ष म्हणून सांगतो, तुम्ही आमच्यावर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. पण माझे पंतप्रधानांना सांगणं आहे. तुमच्याकडे सत्ता आहे ती वापरा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करा त्यात आमचा तुम्हांला पाठिंबा राहील असंही पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar - Bhujbal
Jitendra Ahwad to Ajit Pawar: आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद ; '...पण तुम्ही परत या...

पवार म्हणाले,"महाराष्ट्रात या जिल्ह्यानं अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. या नाशिकमधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल यांच्यावर अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळं आम्ही विचार केला की, मुंबईमध्ये काही लोकांना जनतेच्या समोर सादर केल्यानंतर यश मिळवायचं असेल, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचं असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही या येवल्याची निवड केली असंही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com