Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Saroj Ahire News: राष्ट्रवादी देणार आमदार सरोज अहिरेंना पर्याय!

Sampat Devgire

MLA Saroj Ahire : निधी मिळावा म्हणून अजित पवार गटात गेलेल्या आमदार सरोज अहिरे यांची भावी राजकीय वाटचाल अवघड करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहे. याबाबत खुद्द शरद पवार यांनीच देवळाली मतदारसंघात पर्यायी उमेदवार शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देवळाली मतदारसंघात (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) राजकीय हालचाली गतीमान होण्याची चिन्हे आहेत. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पर्यायी उमेदवार शोधला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर विविध आमदार देखील त्यांच्या गाटत गेले. त्यामुळे शरद पवार पुर्ण ताकदीनीशी मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत पवार यांनी पहिली सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात येवला येथे घेतली होती. जिल्ह्यातील सर्व सहा आमदार मतदारसंघाच्या विकासासाठी अर्थात निधी मिळवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र मतदार तसेच नागरिकांना हे रूचलेले नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे या सातत्याने आपण शरद पवार यांच्या मानसकन्या असल्याचे सांगत होत्या. वरिष्ठ नेत्यांची साथ असल्याने त्यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजिबात महत्त्व न दिल्याने नाराजी होती. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच पर्यायी उमेदवार शोधण्याचेसंकेत दिल्याने या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

आगामी काळात देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली गतीमान होण्याची चिन्हे आहेत. बहुतांश पदाधिकारी अजित पवार गटाकडे गेले आहेत. मात्र कार्यकर्ते शरद पवार गटाकडेच राहील्याचा दावा जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT