Uddhav Thackeray On Ajit Pawar: 'अजित पवारांचं 'ते' वक्तव्य अत्यंत वाईट, सगळं मिळाल्यानंतरही अन्यायाचा टाहो फोडणं.. ; ठाकरेंनी सुनावलं!

Uddhav Thackeray Podcast: "स्वार्थासाठी जातोय, असं खरं बोलून बाहेर पडावं. या खरेपणामुळे यामुळे कदाचित लोक तुम्हाला स्वीकारतील."
Uddhav Tahckeray : Ajit Pawar
Uddhav Tahckeray : Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Awaaz Kunacha Podcast: उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप, टीका-टिपण्णी सुरू झाली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच सभेत अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीवर भाष्य केले होते. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना सुनावले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Tahckeray : Ajit Pawar
EC Notice To Sharad Pawar: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस; आता पवार काय भूमिका घेणार ?

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग काल (दि. २६) आणि दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडली आहेत. या मुलाखतीत संजय राऊतांनी प्रश्न विचारला की, "अजित पवारांनी आपल्या काकांबद्दल किंवा पक्षप्रमुखांबद्दल मत व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला हवं, त्यांचं वय झालंय. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आपलं काय मत आहे?"

राऊतांनी अजित पवार यांच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "अजित पवारांचं हे मत अत्यंत वाईट होतं. शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्व काही घेतो, त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे शोभा देणारे नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान - सन्मान आदर राखत असतो. अजित पवारांच हे वक्तव्य मलासुद्धा आवडलं नाही."

Uddhav Tahckeray : Ajit Pawar
Uddhav Thackeray Birthday News : ठाकरेंच्या वाढदिवसाचा फलक झळकला काश्मीरच्या पर्वतावर; शिवसैनिकाच्या अनोख्या शुभेच्छा!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "तुमचं काही पटत नसेल तर जाहीरपणे सांगा. शरद पवारांनी या वयातही तुम्हाला सर्व काही दिलं. आता त्यांनाच तुम्ही अशा पद्धतीने बोलणं हे मला देखील पटलेलं नाही. अजित पवारच काय कोणालाही स्वार्थासाठी जायचं असेल तर त्यांनी स्वार्थासाठी जातोय, असं खरं बोलून बाहेर पडावं. या खरेपणामुळे कदाचित लोक तुम्हाला स्वीकारतील. पण सगळं काही मिळाल्यानंतर, सर्व काही दिल्यानंतरही अन्याय झाला म्हणून टाहो फोडून जाणं, हे बरोबर नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com