Gulabrao Devkar
Gulabrao Devkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP: आगामी निवडणुकांमध्ये ‘वन बूथ टेन यूथ’ योजना

Sampat Devgire

जळगाव : आगामी जिल्हा परिषद, (Zillha Parishad) पंचायत समिती आणि पालिकांच्या निवडणुकांमध्ये ‘वन बूथ टेन यूथ’ (One booth ten youth) ही संकल्पना राबविली जाणार आहे. कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने आपली तयारी करावी, अशा सूचना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांनी जळगाव तालुक्यातील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केल्या. (NCP tsken promot organisation devolopment drive)

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जळगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणप्रमुखांची मंगळवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

श्री. देवकर म्हणाले, की येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात सूक्ष्म पातळीवर नियोजन करून काम करावे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बापू परदेशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप पाटील, जिल्हा सरचिटणीस हेमंत पाटील (आसोदा), जिल्हा संघटक गोकुळ चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष भूषण पवार, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, युवक अध्यक्ष बंटी चव्हाण, युवक संघटक ईश्वर पाटील, प्रवक्ता राजेश वाडेकर, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस योगराज सपकाळे, किसान सेलचे अध्यक्ष लाला सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT