Narhari Zirwal
Narhari Zirwal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या झिरवळांनी गड राखला; भाजप, शिंदे गटाचा धुव्वा

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचाय निकाल जाहिर झाले आहेत. त्यामध्ये पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांनी मुसंडी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तब्बल २१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला जिंकला आहे. त्यामुळे या निवडणुक निकालाने भावी राजकारण बदलण्याची चिन्हे आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अवघी एक जागा मिळाली. एकेकाळी पेठ हा या पक्षाचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचेही वर्चस्व होते. मात्र, आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालांतून या दोन्ही पक्षांचे पानीपत झाले आहे. तर भाजप आणि शिंदे गटालाही धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने २१ ग्रामपंचायतीत सरपंच विजयी झाले आहेत. यामध्ये मेघराज भागवत राऊत (आंबे), पाहुचीबारी -रमेश जगन्नाथ चवरे, उस्थळे - चंद्रकला चिंतामण भुसारे, शिंदे-रोहिणी सुरेश गवळी, करंजाळी-दुर्गनाथ नारायण गवळी, कोपूरली खुर्द - मनीषा गणपत पालवी, तिरढे-सोमनाथ नामदेव नाठे, कायरे - प्रभावती पुंडलिक सातपुते, दोनवाडे - सुरेश जाधव, उमरदहाड - जिजाबाई कुंभार, भायगाव - शंकूतला मनोहर चौधरी, सावळघाट - मनोज हरी भोये, कुंभारबारी - दीपाली किरण भोये, जांबविहीर - प्रवीण विठ्ठल गवळी, धानपाडा - विठाबाई निवृत्ती गालट, चोळमुख - कुसून नारायण पेटार, शेवखंडी - लिलाबाई मनोहर चौधरी, गोंदे - संदीप माळगावे, डोल्हारमाळ - संगीता मनोहर बठाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी सरपंच

शिवसेनेचे विजयी सरपंच असे, राजबारी - शाम भास्कर गावित (शिवसेना नेते भास्कर गावित यांचा मुलगा), गावंध - धनराज वसंत ठाकरे, पाटे - रुख्मिनी मधुकर गुंबाडे, म्हसगण - उर्मिला विलास अलबाड, कुंभाळे - मनोहर भाऊराव कामडी, कोहोर - शांताबाई शांताराम चौधरी, कळमबारी - विष्णू काशिनाथ मुरे,माळेगाव - दिलीप दामू राऊत, शिवशेत - सुनंदा येवाजी भडगे, कोपूरली बुद्रुक - मीराबाई भाऊराव वाघेरे, एकदरे - गुलबा जगन सापटे, गांगोडबारी - मोहन हिरामण गवळी, कोतंबी - किरण पुंडलिक भुसारे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे या विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्ष वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला आहे. आडगाव भु. -रेखा नेताजी गावित या त्यांच्या एकमेव सरपंच विजीय झाल्या आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या दोन गावांत सरपंचपदी विजयी झाले. कुळवंडी - सुनंदाबाई हेमराज सहारे, आसरबारी - गीता विशाल जाधव हे आहेत.

अपक्षांचे वर्चस्व

तीस गावांत तरुण पिढीतील कार्यकर्ते व नेत्यांनी जोर लावला होता. तीस सरपंच अपक्ष असल्याने निवडणुकीत त्यांचे वर्चस्व राहिले आहे. यामध्ये नेवाळ नामदेव (सुरगाणे), धोंडमाळ -शिंगाडे बायजबाई मधुकर, करंजखेड - कमलेश हनुमंत वाघमारे, जोगमोडी - हेमराज दामू राऊत, कापूर्णे दाभाडी - उषा पुंडलिक गवळी, हातरुंडी - शोभा गोवर्धन सातपुते, जुनोठी - संदीप चंद्रकांत भोये, खिरकडे - कलावती सुरेश भोये, जळे - मनोहर लक्ष्मण चौधरी, अशोक मुकणे - बाडगी, लिंगवणे - सोमनाथ शांताराम पोटींदे, आड बुद्रुक - घनश्याम महाले, हनुमानवाडी - पद्माकर पांडुरंग गायकवाड, हनुमंतपाडा - वृषाली जनार्दन गवळी, जांभूळमाळ - एकनाथ ढाडर, देवगाव - यादव रावजी राऊत, बोरवट - पंकज दिलीप पाटील, उंबरपाडा - अनिता सचिन गवळी, उभीधोंड/मांगोने - हेमराज भगवान गवळी, हरणगाव - पल्लवी विजय भरसट, वांगणी - मीरा संजय फुकाणे, रानविहिर - कौशल्या देवराम भुसारे, खोकरतळे - सविता यशवंत भुसारे, तोंडवळ - नामदेव गणपत वाघेरे, कहाडोळपाडा - तुळशीराम विठ्ठल भांगरे, भुवन - विलास पांडुरंग दरोडे, मनकापूर - भारती जगन रिंजड, बोंडारमाळ/उमरद - रतन गंगाराम पेटार, पिंपळवटी - राशी पंडित भांगरे, देवीचामाळ - नामदेव रामचंद्र गावित, शिंगदरी - तुळशीराम किसन पागी, घनशेत - शांता रविनाथ चौधरीष रुईपेठ - विनायक पुंडलिक भोये, आमलोन - वनिता देवेंद्र भोये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT