Gopichand Padalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News; पडळकर सुधरा, अन्यथा यथेच्छ तुडवू!

असभ्य भाषा वापरणाऱ्या गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा इशारा

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत सातत्याने टीका करणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना भयगंड झाला आहे. आपण टिका केली नाही, तर भाजपला (BJP) आपली गरज राहणार नाही. भाजप आपल्याला अनुल्लेखाने संपवील या भितीने पछाडल्याने, ते भाजपच्या दारात बांधलेले मती हरवलेले श्वान झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP womens wing president criticised Gopichand Padalkar)

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकर यांची कोणीही दखल घेऊ शकत नाही. त्यांनी आयुष्यात समाजहिताचे केलेले एक तरी चांगले काम दाखवावे हे आमचे आव्हान आहे. याची त्यांना पुरेपुर कल्पना असल्याने आपली बेताल वक्तव्ये करून भाजपच्या उपकाराची परतफेड करण्यात रात्रंदिवस मग्न आहेत.

दोडी (सिन्नर) येथील एका कार्यक्रमात पडळकर यांनी शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत आपल्या नेहेमीच्या शैलीत असभ्य भाषेचा वापर केला. खरे तर शेतकऱ्यांच्या या कार्यक्रमात शरद पवार यांनी देशातील शेती व शेतकरी यांच्यासाठी केलेली कामे सर्वांना माहित आहेत. त्याबाबत अज्ञानी पडळकर यांना काय समजणार?, असा टोमणा भामरे यांनी मारला.

त्या पुढे म्हणाल्या, पडळकर यांची स्मृती भ्रमीत झाली असावी. शेतकऱ्यांच्या या मेळाव्यात भाजपचे अनुयायी म्हणून माफी मागणे अपेक्षीत होते. देशात शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यासाठी शेतकरी विरोधी तीन कायदे भाजपच्या केंद्र सरकारने केले होते. त्याविरोधात झालेल्या आंदोलनात शेतकरी एकजुटीने उभा राहिला. त्यांची अवहेलना भाजपने केली. अनेक शेतकरी या आंदोलनात मृत्यू पावले. त्याचे पाप भाजपच्या माथी आहे. त्यासाठी पडळकर यांनी माफी मागायला पाहिजे होती.

महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला माहित आहे की, आमदार पडळकर मंगळसूत्र चोर, पाकिट चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर पोलिस दप्तरी गुन्ह्याची नोंद देखील आहे. त्यामुळे चोर कोण हे सांगण्याची गरज उरली नाही. राहिला प्रश्न पवार कुटुंबांतील सर्वच सदस्यांचा तर गोपीचंद यांची पवारांविषयी बोलण्याची लायकी नाही. यापुढे आपण आपली लायकी बघून बोलावे. आमच्या नेत्यांविषयी जेव्हा आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून बेताल वक्तव्ये होतील त्याला आम्ही जसेच तसे उत्तर देऊ. सुधारणा न केल्यास राष्ट्रवादीकडून आपणांस यथेच्छ तुडवले जाईल असा इशारा देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT