Sharad Pawar & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola NCP News : राष्ट्रवादी भुजबळांमागेच, पण ‘शरद पवार’ यांच्यासाठी शिंदे रंणागणात!

येवल्याच्या राजकारणातही निर्माण झाली अस्थिरता, पवार, बनकर, दराडेंच्या भूमिकेकडे लागल्या नजरा

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : येवला- लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळांची एकहाती सत्ता आहे. किंबहुना अजून तरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांमागेच आहे. त्यामुळे भुजबळांच्या बालेकिल्ल्यात पक्षप्रमुख शरद पवारांसाठी कोण पुढे येणार? या प्रश्‍नाचे उत्तर बुधवारी मिळाले. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांच्या बाजूने रिंगणात उडी घेऊन थेट राज्यातली पहिली सभाच येथे घेण्याचा निर्णय घेत, तारीखही मिळविल्याने येथील राजकारणात नवा क्लायमॅक्स दिसणार आहे. (Sharad Pawar Follower getting support in the Stronghlod of Chhagan Bhujbal`s Yeola)

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chahagn Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाणे पसंत केले. ते मंत्री देखील झाले. मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे.

याशिवाय भुजबळांच्या येथील राजकारणातील भूमिकेकडेही लक्ष लागले आहेच; पण राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर, माजी आमदार मारोतराव पवार व संभाजीराजे पवार, तसेच शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या आगामी राजकीय भूमिकांकडेदेखील लक्ष लागून आहे. येथे भुजबळांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून अमृता पवार तर शिवसेनेकडून कुणाल दराडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

त्यानुसार राष्ट्रवादी- भाजपा- शिंदे गटाचे उमेदवार भुजबळ होणार हे निश्‍चित आहेच. मात्र, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचा पवार गट एकत्र लढल्यास दराडे उमेदवार होतील की पुन्हा एकदा संभाजी पवार उमेदवारी मागतील हा प्रश्‍न आहे. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात प्रचार केला म्हणून राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेले ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे पुन्हा एकदा मोठ्या साहेबांच्या समर्थनार्थ रिंगणात उतरले असल्याने त्यांनीही पवार गटाकडून उमेदवारी मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

मोजकेच समर्थक मुंबईला

मुंबईत अजित पवार यांच्या गटाच्या मेळाव्याला येथून समता परिषदेचे मोहन शेलार, वसंतराव पवार, ज्ञानेश्‍वर दराडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रकाश वाघ, ज्ञानेश्‍वर शेवाळे, शिवाजी गांगुर्डे, राजश्री पहिलवान असे मोजकेच कार्यकर्ते गेले होते. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर मात्र अनुपस्थित होते. बनकर व पवार परिवाराचे अनेक वर्षांचे स्नेहाचे नाते आहे. मात्र, सध्या बनकर भुजबळांसोबत आहे. अर्थात्‌ आज कुणालाही मुंबईला या असे सांगितले गेले नसल्याने अनेक जण मेळाव्याला गेले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पवार, दराडेंची भूमिका काय?

ज्येष्ठ नेते, माजी आमदार मारोतराव पवार आणि शरद पवारांचे अगदी जवळचे नाते आहे. मात्र राष्ट्रवादीत संधी मिळत नसल्याने मारोतरावांसह माजी सभापती संभाजीराजे पवार शिवसेनेत गेले आहेत. त्यातच गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरलेले भुजबळ व संभाजीराजे यांच्यात मागील वर्षभरापासून महाविकास आघाडीच्या निमित्ताने दिलजमाई झाली आहे.

आता बदललेल्या समिकरणामुळे स्थानिक राजकारणात पुढे काय? याकडे लक्ष लागले आहे. भुजबळ अजितदादांसोबत गेल्याने विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारीचा दराडे बंधूंचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते. मात्र, संभाजीराजे पवारदेखील बदलत्या राजकीय समीकरणात निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात असल्याने येथील राजकारणातील घडामोडी लक्षवेधी ठरतील हे नक्की. या सगळ्या परिस्थितीत तालुक्यातला कोण नेता व कोण पदाधिकारी कुणाच्यासोबत याविषयी मात्र नागरिकांमध्ये खमंग चर्चा रंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT