Nashik News : राज्यात तीन दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना नाशिक जिल्ह्यात पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील एका माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
नांदगाव विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि त्यांचे सहकारी अल्ताफ खान, आदी समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत बुधवारी रात्री (ता.५) प्रवेश केला.
मुंबई येथे वर्षा बंगल्यावर हा प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे , आमदार सुहास कांदे ,फरहान खान, मयूर बोरसे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि त्यांचे सहकारी अल्ताफ खान यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आमदार सुहास कांदे यांची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा शिंदे गटाला होणार आहे. "आपण विकासाच्या मुद्यावर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करू," असा शब्द देशमुख यांनी पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.
तर दुसरीकडे राज्यात चाललेल्या सत्तासंघर्षाच्या लाटेत नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. नाशिक रोड परिसरातील कार्यकर्ते प्रारंभी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याच्या मनस्थितीत होते. हे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्याबरोबर जाणार आहेत.
अजित पवार यांच्या पाठीशी कोण याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड येथील कार्यकर्ते सध्या एकवटले आहेत. पक्षाचे नाशिक रोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी आमचा विचार पक्का असल्याचे सांगितले आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.