Mehboob Shaikh, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप म्हणजे ‘भारत जलाव पार्टी’

तळोदा येथील सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपवर टिका केली.

Sampat Devgire

तळोदा : निवडणुकीच्या तोंडावर जातीयवाद निर्माण करणे हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) काम असून, भाजप ही संविधान मानणारी पार्टी (Constitution of India) नसून मनुस्मृती मानणारी आहे. भाजप म्हणजे ‘भारत जलाव पार्टी’ असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात शरद पवारांचे (Sharad Pawar) विचार पोचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपली आहे, असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेचे फोटो पाठवा, असे प्रतिपादन युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob shaikh) यांनी केले.

शरद युवा संवाद यात्रेनिमित्त तळोद्यात सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की ७० वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे चित्र भाजपकडून रंगविण्यात येते. भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून, त्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत. तसेच पाळण्याची दोरी हातात असणाऱ्या महिलांच्या हातात शरद पवारांमुळे झेंड्याची दोरी आली, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करीत इंधन दरवाढीवर टीका केली. उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होईल, यादृष्टीने आतापासून कामाला लागण्याचा सूचना त्यांनी दिल्या. आमदार नसलो तरी तळोदा मतदारसंघात मोठा निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अनेक नागरिकांनी विशेषतः युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तळोदा राष्ट्रवादीकडून मेहबूब शेख यांना सांगण्यात आले की, आज होणारे सर्व प्रवेश खरे असून, प्रवेश घेणाऱ्यांनी स्वतः राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मेहबूब शेख यांनी प्रवेश घेणाऱ्यांची यादी मागवत एकेक नाव वाचत, शाळेत ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात येते त्याप्रमाणे प्रवेश घेणाऱ्यांची हजेरी घेतली. सभेत अशी हजेरी घेण्याची शहरातील ही पहिलीच वेळ असावी.

प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी, सत्यजित सिसोदे, ललित बागूल, राऊ मोरे, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेविका अनिता परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, निखिल तुरखीया, सीताराम पावरा, भरत चौधरी, नितीन पाडवी, पुंडलिक राजपूत, कमलेश चौधरी, पुरुषोत्तम चव्हाण, डॉ. रामराव आघाडे, डॉ. तुषार संनसे, केसरसिंग क्षत्रिय, डॉ. जगदीश मराठे, कमलेश पाडवी, योगेश पाडवी, प्रल्हाद फोके, संदीप परदेशी, याकूब पिंजारी, निखिल तुरखीया,अविनाश मराठे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT