Navneet Rana & Ravi Rana
Navneet Rana & Ravi Rana Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना नाशिकला गुन्हा दाखल होणार?

Sampat Devgire

नाशिक : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. या दोघांच्या विरोधात धार्मिक (Communal harmony) सौहार्द बिघडवणे व राजकीय कट कारस्थान (Political conspiracy) करण्याचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत शिवसेनेच्या (Shivsena) शिष्टमंडळाने पोलिसांना तक्रार दिली आहे.

या संदर्भात शिवसेनेचे उपनेते सुनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेतली. त्यांनी याबाबत सविस्तर तक्रारीचे पत्र पोलिसांना दिले आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री, राज्य शासन व पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य व वर्तन केले. त्याद्वारे महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी करम्यात आली. पोलिसांनी त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शन घेतल्यानंतर पुढील कारवाईचे आश्वासन दिले.

तक्रारीत म्हटले आहे की, आमदार राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. ते अमरावतीचे असताना ते मुंबईला येऊन परिस्थिती बिघडवत आहेत. संबंधीत दोन्ही लोकप्रतिनिधी समाजाला उत्तरदायी आहेत. सध्या त्यांनी केलेले कृत्य व त्यामागील हेतू राज्य सरकार उलथून टाकण्यासाठी व सार्वजनिक शांतता बिघडवण्यासह धार्मिक भावनांना हात घालण्याचे आहे. विरोधकांकडून खेलल्या जाणाऱ्या या अत्यंत हीन दर्जाच्या राजकीय अजेंड्याचा तो एक भाग असल्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यातून विविध समाज घटकांत गोंधळ निर्माण होऊन राज्यातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवणे हा हेतू आहे. राणा दाम्पत्यांना ते चांगल्या प्रकारे माहित होते. तरीही त्यांनी हा प्रकार केलेला आहे.

कोणतेही कारण नसताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर एकत्र येण्याची धमकी राणा दाम्पत्याने दिली. माध्यमांच्या प्रतिनिधी व पोलिसांसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना व त्या मागील छुपा हेतू वेगळेच कारस्थान करण्याचा होता. हे दोघेही विरोधी पक्षाशी संबंधीत असल्याने त्यांचे हे कृत्य सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या हेतूने केलेले दिसते. त्यामुळे त्यात भारतीय दंड विधान २६८ नुसार तसेच सीआरपीसी कलम १४४ अन्वये सार्वजनिक उपद्रव घडवून आणण्याचा होता. हा दंडनीय अपराध असल्याने त्यांच्या विरोधात गंभीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपनेते श्री. बागुल यांसह महानगर उफप्रमुख सुनील जाधव, महानगर संघटक योगेश बेलदार, शैलेश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, समन्वयक सुनील निरगुडे, महेंद्र बडवे, संजय थोरवे, विभाग प्रमुख चांगदेव गुंजाळ आदी उपस्थित होते..

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT