राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांचा अल्टीमेटम मागे घेतील?

आज मुंबईत गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे.
Dilip Walse patil & Raj Thakre
Dilip Walse patil & Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्‍यात (Maharashtra) गाजत असलेल्‍या भोंग्‍यांच्‍या प्रश्‍नासंबंधी आज सर्व विरोधी पक्षांची (Opposition parties) बैठक होत आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांचाही समावेश आहे. श्री. ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे व औरंगाबादची सभा याबाबत आधीच ठाम असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) देखील कणखर भूमिका घेतील का? याची उत्सुकता आहे.

Dilip Walse patil & Raj Thakre
पोलिसांना आता ८ तासांची ड्यूटी अन् १ लाख घरे!

नाशिक येथे गृहमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत विरोधी पक्षांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यामध्ये बैठकीतील चर्चेतून भोंगाप्रश्‍नी ठोस तोडगा काढू असा दावा त्यांनी केला.

Dilip Walse patil & Raj Thakre
`एसटी`ची गाडी आली रुळावर...प्रवासी मात्र बांधावर!

या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्‍या पदाधिकाऱ्यांना बोलविले आहे. असे असले तरी सरकार अस्‍थिर करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. हा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठी त्यांनी अतिशय सुत्रबद्ध पद्धतीने प्रयत्न चालविले आहेत. त्या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारला आजच्या बैठकीत तेव्हढाच प्रभावी डाव टाकावा लागेल असे चित्र आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व दिले जाते आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्‍यांच्या कारवाया दिलेले महत्व व त्यावरील प्रतिक्रीयांचा विचार करता या कृतीमागे कुणाचा तरी हात निश्‍चित आहे. त्‍याशिवाय ते इतके धाडस करू शकत नाहीत. नेमके कुणाच्‍या सांगण्यावरून हे सुरू आहे, याचा शोध घेतला जाईल. कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने त्‍यांना अटक केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. हे प्रश्न आज नव्याने चर्चेला येतील.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com