Nashik Political News : नाशिक जिल्ह्यातील नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीतून भास्करराव भगरे यांची खासदार म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्याकडे आता विविध कामांबाबत निवदेने येऊ लागली आहेत. तसेच खासदार झाले म्हणून अनेक ठिकाणांहून सत्काराचे निमंत्रणेही येत आहेत. त्यांना मात्र लोकसभेच्या नंतर लागू झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोणतेही पाऊल उचलता येत नाही.
लोकसभा निवडणूक आटोपली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे Rajabhau Waje विजयी झाले. दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्करराव भगरे विजयी झाले. आता राज्यातील काही खासदारांनी कामेही सुरू केली आहेत. त्यानुसारच नाशकातील या दोन्ही नवनिर्वाचित खासदारांकडे विविध कामांसाठी दररोज लोकांचा रांगा लागत आहेत. मात्र नाशिक विभागात आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या ७ जुलैपर्यंत ही आचारसंहिता कायम राहणार आहे. आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने खासदारांना आपली कामे सुरू करता येत नाही.
याबाबत नुकतेच खासदार वाजे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. काही अपेक्षाही व्यक्त केल्या. मात्र आचारसंहितेत प्रशासन व्यस्त आहे. त्यामुळे कोणत्याही बैठका घेता येत नाही. बैठका होत नसल्याने विषय मार्गी लागत नसल्याची खंत खासदार वाजे यांनी व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्रात आठ खासदार आहेत. शिक्षक मतदारसंघ सबंध उत्तर महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे या सर्वच आठ नवनिर्वाचित खासदारांना कामे सुरू करता आलेली नाही. यातील बहुतांशी खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना आचारसंहितेच्या बेड्या त्रस्त करीत आहेत. आचारसंहितेमुळे अनपेक्षित कोंडी झालेल्या सर्व खासदारांना आता या बेड्या सहन होत नाहीत असे चित्र आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.