Kapil Patil : कपिल पाटील रिटायर्ड; दिलं मोठं कारण...

MLC Election : समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील 2006 पासून सलग मुंबई शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले. यावेळी मात्र त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.
Kapil Patil
Kapil PatilSarkarnama

Mumbai Shikshak Matdarsangh : मुंबई शिक्षक मतदारसंघातून तीन टर्म विधान परिषदेत आमदार असलेल्या कपिल पाटील यांनी आपण रिटायर्ड होत असल्याची घोषणा केली. त्यांच्याऐवजी या मतदारसंघातून समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे रिंगणात आहे. मुंबई शिक्षक मतदार संघातून चौरंगी लढत होत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील Kapil Patil मुंबई शिक्षक मतदारसंघाचे 2006 पासून सलग प्रतिनिधित्व केले. यावेळी मात्र त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी त्यांनी शिक्षकांच्या निवृत्तीच्या वयाचे कारण दिले आहे. ते म्हणाले, माझ्या तीन टर्म झाल्या म्हणून की निवृत्त होत आहे. शिक्षक 58 वर्षी निवृत्त होतो, मग ती अट शिक्षकांच्या प्रतिनिधींना नको का? ही विचार करूनच मी शिक्षक मतदारसंघातून निवृत्ती घेत आहे.

मुंबईच्या शिक्षकांनी धनशक्ती आणि बलशक्ती झुगारून मला तीन वेळा आमदार केले आहे. यासाठी त्यांची एकजूट दिसून आली. नाशिकमध्ये गैरप्रकार सुरू झाले असले तरी मुंबईच्या शिक्षकांनी कधीही याला थारा दिला नाही. गेल्या निवडणुकीत दोन पक्षांनी याचा वापर केला होता. आमदार म्हणून आम्ही शिक्षकांना सन्मान दिला. त्यांचे वेतन सुकर केले. महिला शिक्षकांना मॅटर्निटी सुट्टी मिळवून दिली, आदी कामांचाही त्यावेळी उहापोह केला.

Kapil Patil
Manoj Jarange : मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित; काय आहे पुढचा प्लॅन?

दरम्यान, पाटील हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumar यांच्या संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. मात्र भाजपशी संधान बांधल्याने पाटील त्या पक्षातून बाहेर पडले आणि समाजवादी गणराज्य पक्ष स्थापन केला. आता हा पक्ष राज्यातील महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र मुंबई शिक्षक मतदारसंघात शिंदे गट, अजित पवार गटासह ठाकरे गटाचाही उमेदवारी आहे. या तिघांविरोधात पाटील यांचे मोर आपला गड राखणार का, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kapil Patil
MLC Election 2024 : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वेगळं वळण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com