Late Gopinath Munde statue
Late Gopinath Munde statue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gopinathgad News; गडकरी, मुख्यमंत्रीही येणार, फडणवीस का नाही येणार?

Sampat Devgire

सिन्नर : (Sinner) नांदुर शिंगोटे (सिन्नर) येथे (कै) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) स्मारकाचे लोकार्पण येत्या 18 मार्चला होत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाला गडकरी, शिंदे आले अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) का नाही आले, याची उत्सुकता आहे. (Why Dy. CM devendra Fadanvis Not coming for Gopinath Munde commemoration programme)

या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेतेगण उपस्थितीत राहणार असल्याची माहिती लोकनेते (स्व) गोपीनाथ गड स्मारक समितीतर्फे युवा नेते उदय सांगळे यांनी दिली. यामध्ये माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित राहतील. स्थानिक नेत्यांचा देखील सहभाग असेल. मात्र राजकारणातील प्रत्येकाला या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. सिन्नर तालुक्याचे राजकारण पक्षांपेक्षा नेत्यांच्या गटात विभागलेले असल्याने त्यातून तालुक्याच्या राजकारणासाठी नव्या समीकरणांचा उदय होईल का याची उत्सुकता आहे.

नांदूरशिंगोटे गावातील दोन एकर जागेत असलेल्या तळ्याला काँक्रिटचे अस्तरीकरण करण्यात आले. तळ्याच्या मधोमध १६ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या आजुबाजूला बगीचा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक तसेच तळ्यामध्ये बोटींगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले. त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले.

असा आहे पुर्णाकृती पुतळा

नांदूरशिंगोटे गावातील दोन एकर जागेत असलेल्या तळ्याला काँक्रिटचे अस्तरीकरण करण्यात आले. तळ्याच्या मधोमध १६ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या आजुबाजूला बगीचा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक तसेच तळ्यामध्ये बोटींगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले. त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले.

सोहळ्यास उपस्थित राहावे : वाजे

गावागावातील प्रत्येक नागरिकांनी, कार्यकत्यांनी नांदूरशिंगोटे येथे होणाऱ्या लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सोहळा नियोजनासाठी झालेल्या बैठकीत केले. युवा नेते उदय सांगळे, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, सरपंच रवींद्र पवार ,पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, माजी नगरसेवक मनोज भगत, शैलेश नाईक, विनायक शेळके, विठ्ठल राजेभोसले, भजूनाथ शिरसाट, देविदास वाजे, सरपंच अरुण वाघ आदी उपस्थित होते.

या स्मारकासाठी शीतल सांगळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने निर्णय झाला. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्हा परिषदेकडून मंजुरीचे सोपस्कार झाल्यानंतर तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. बरेच दिवस पाठपुरावा केल्यानंतर देखील त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आढळले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबत चौकशी केल्यावर या प्रस्तावाची फाईल सापडेना. त्यामुळे बरीच शोधाशोध करावी लागल्याचे बोलले जाते. काही कार्यकर्त्यांनी नवी फाईल तयार करण्याचे ठरवले. त्यानंतर ती फाईल सापडली, अशी चर्चा आहे. पुढे राज्य शासनाकडून त्याला मंजुरी मिळाल्यावर स्मारकाचे काम सुरु झाले. फडणवीस यांच्या कारकिर्दीत मंजुरी मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT