Shivsena News : उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; निकटवर्तीय दीपक सावंत जाणार शिवसेनेत

Deepak Sawant : आठवड्यात दोन निकटवर्तीय शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाची चिंता वाढणार
Deepak Sawant
Deepak SawantSarkarnama

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाईंचे चिरंजीव भूषण यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यानंतर आज आणखी ठाकरेंच्या जवळचे नेते असलेले माजी मंत्री दीपक सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री आणि माजी मंत्री दीपक सांवत (Deepak Sawant) यांच्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बोलणी सुरू होती. त्यानंतर आज सावंत यांच्या शिवसेनेत (Shivsena) पक्षप्रवेशाची माहिती मिळत आहे. हा प्रवेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आठवड्यातच भूषण देसाईनंतरचा दुसरा धक्का मानला जात आहे.

दीपक सावंत (Deepak Sawant) उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे नेते होते. महायुती सरकारमध्ये सावंत यांनी आरोग्य खाते सांभाळले होते.जुन्या शिवसेनेत सावंत यांची महात्वाची भूमिका राहिलेली आहे. विधानपरिषदेच्या कामकाजामध्ये उद्धव ठाकरे त्यांचा सल्ला घेत होते.

Deepak Sawant
Chitra Wagh : संजय राऊतांनी ‘या’ विषयात ज्ञान पाजळू नये...

दोन दिवसांपूर्वी ठाकरेंचे विश्वासू नेते सुभाष देसाईंचा (Subhash Desai) मुलगा भूषण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावळी देसाईंनी भूषण यांचे राजकारणात काही काम नाही. त्यांच्या शिवसेनेत जाण्याने काही फरक पडणार नाही. मी ठाकरेंच्या शिवसेनेचे गतवैभव प्राप्त होईपर्यंत काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Deepak Sawant
Budget : राज्‍याच्‍या सर्वांगीण विकासाच्‍या आशा फोल... पृथ्‍वीराज चव्‍हाण

कोण आहेत दीपक सावंत ?

शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी

दीपक सावंत हे विधानपरिषदेवर जुलै २००४ मध्ये प्रथम वर्णी लागली

२००६ आणि २०१२ मध्ये पुन्हा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले

२०१४ मध्ये सेना-भाजप सरकारमध्ये आरोग्य खाते सांभाळले

२०१४ मध्ये भंडारा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जाबादारी सांभाळली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com