Newasa Municipal Election : नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा क्रांतीकारी शेतकरी पक्षाविरोधात बलाढ्य महायुतीचा समाना रंगला आहे. भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. विखे पाटील यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली.
'संगमनेरची गाडी रुळावर आणली, आता मी नेवाशाचा 'व्हीजीटिंग डाॅक्टर' आहे. नेवाशाची गाडी देखील रुळावर आणणार आहे, आणि आपण ते करू शकतो,' अशी टोलेबाजी विखे पाटील यांनी केली.
माजी खासदार सुजय विखे म्हणाले, "नेवासा इथं अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावर एका दिवसात तोडगा निघेल, असे नाही. मात्र नेवाशात जिल्ह्याला राजकीय क्षमता देण्याची ताकद आहे. नेवाशाची विकासाची जबाबदारी आमची आहे. तालुक्यात कुणी म्हणतंय आम्ही इकडे जाणार, तिकडे जाणार, मात्र आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही, असा टोला माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे नाव न घेता लगावला."
'देशात पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री, तालुक्याला आपला आमदार म्हणून महायुतीचं फक्त विकास करू शकते, म्हणून महायुतीला (Mahayuti) निवडून द्या. आम्ही निवडणुकीसाठी जाती धर्माचा सहारा घेत नाही. आमची लढाई विकासाची आहे. नेवासे शहरात विकास गंगा महायुतीच्या रूपाने वाहिल,' असेही विखे पाटील यांनी म्हटले.
महायुतीमधील नगरध्यक्ष पदाचे उमेदवार हे देखील एक डॉक्टर असताना, आता दुसरे डॉ. विखे पाटील मदतीसाठी आले, अशी विचारल्यावर, 'नेवाशाला हेच डॉक्टर आहे. मात्र एक व्हीजीटिंग डाॅक्टर असतो, तसा मी यापुढे दर महिन्याचा व्हीजीटिंग डॉक्टर असणार आहे, विखे पाटील यांनी म्हणताच, एकच हशा पिकला.'
आमदार विठ्ठलराव लंघे यांनी, शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे स्वप्न आहे. नेवासा ही ऐतिहासिक भूमी असून, अनेक वर्षापासून ज्यांनी सत्ता भोगल्या, त्यांनी नागरिकाच्या तोंडाला पाने पुसली. तेच-तेच चेहरे समोर आणून जनतेचा भ्रम निराश केला. ज्या पक्षाला शेंडा-ना-बुडूख नाही, असा पक्षाला निवडून न देण्याचं आवाहन केलं.
नेवासा इथं महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योजक प्रभाकरराव शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, किसनराव गडाख आदी उपस्थित होते. नगरपंचायत चौकात झालेल्या सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले. शंकरराव लोखंडे यांनी स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.