AIMIM corporator Matin Patel  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik TCS Case : निदा खान प्रकरणात मतीन पटेलांची रात्री उशिरापर्यंत चौकशी, एसआयटीकडून फक्त 3 प्रश्नांवर भर

Nida Khan Case, Matin Patel, SIT Inquiry : एसआयटीकडून यापूर्वी दोन वेळा मतीन पटेल यांची चौकशी करण्यात आली आहे. गुरुवारी तिसऱ्यांदा पुन्हा पटेल यांची चौकशी करण्यात आली.

Ganesh Sonawane

Nashik TCS Case : नाशिकमधील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैगिंक शोषण व कथित धर्मातरण करण्याचा प्रयत्न प्रकरणात मुख्य संशयित असलेली निदा खान गेली ४० दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनाही सहआरोपी करण्यात आलेलं असून आतापर्यंत एसआयटीकडून त्यांची तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे.

मतीन पटेल गुरुवारी दि. ४ जून रोजी तिसऱ्यांदा एसआयटीसमोर हजर झाले. एसआयटीने त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. त्यांच्यावर प्रश्नांचा मारा केला गेला. पण यात पोलिसांचा भर फक्त मुख्य तीन प्रश्नांवर होता.

'निदा खानसोबत ओळख कशी झाली?, 'ओळख कोणी करून दिली?, 'कोणाच्या माध्यमातून अथवा ओळखीने तिला आश्रय देण्यात आला?' या तीन प्रमुख प्रश्नांवर भर देत एसआयटीने रात्री उशिरापर्यंत पटेल यांची चौकशी केली.

या चौकशीतून SIT पथकाच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याचे सांगितले जात आहे. तसेच, एसआयटीने मतीन पटेल यांच्या आवाजाचे नमुनेही घेतले आहेत.पहिल्या चौकशीवेळी एसआयटीने त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्याच्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.

TCS कंपनीतील पीडितेवर अत्याचार करून तिचे धर्मातर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निदा खानसह दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्याविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात दानिश व तौसिफ ला पोलिसांनी आधीत ताब्यात घेतलं होतं.

मात्र, निदा खान पोलिसांना सापडत नव्हती. तब्बल चाळीस दिवसानंतर निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून तपास पथकाने अटक केली होती. या काळात तिला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पटेल यांच्यासह घरमालक हानिफ शेख यांनाही सहसंशयित आरोपी करण्यात आले आहे.

मतीन पटेल यांची यापूर्वी 25 मे रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर 1 जून रोजी त्यांची तब्बल दहा ते बारा तास चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT