Nashik TCS Case : नाशिक धर्मांतरण प्रकरणात नवा ट्विस्ट! इम्तियाज जलील आणि निदा खान नातेवाईक? मतीन पटेलांनी सांगितले धक्कादायक सत्य

Mateen Patel On Imtiaz Jaleel Nida Khan Connection In Nashik TCS Case : नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणात नगरसेवक मतीन पटेल याच्या चौकशीत नवा खुलासा समोर आला असून पोलीस तपासाला धक्कादायक वळण आले आहे.
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khansarkarnama
Published on
Updated on

Mateen Patel Nashik TCS Conversion News: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची पोलिसांनी नुकतीच चौकशी केली. यापूर्वी देखील त्यांची चौकशी झाली होती. मात्र मतीन पटेल यांनी नव्याने धक्कादायक माहिती दिली आहे.

नाशिकच्या टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतरण प्रकरणात निदा खान ही मुख्य संशयित आहे. तिला संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक व मतीन पटेल हे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत.

मतीन पटेल याची नुकतीच नाशिकच्या पोलिसांनी चौकशी केली. यावेळी मतीन पटेल यांनी दिलेल्या माहितीने या तपासाला वेगळे वळण मिळू शकते. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवक पटेल यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याबाबत नवा खुलासा केला आहे. काही राजकीय नेते इम्तियाज जलील आणि निदा खान नातेवाईक असल्याचा प्रचार करत आहेत. मात्र यात कोणतेही तथ्य नाही, असे एका वाहिनीला मतीन पटेल याने सांगितले आहे.

Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Nashik TCS Case: नाशिक 'टीसीएस' धर्मांतरण प्रकरण, न्यायालयाचा आरोपींना पुन्हा दणका; जामीन अर्ज फेटाळला

निदा खान आणि तिच्या आई-वडिलांनी आपल्याशी संपर्क केला होता. तेव्हा ते कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे काय? याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. माणुसकी म्हणून त्यांना मदत केली, असे पटेल याने पोलीस तपासात सांगितले आहे.

कोणतीही अडचण आली अथवा मार्गदर्शन लागले तर इम्तियाज जलील हे माझे नेते आहेत. या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी संपर्क करत असतो. या संदर्भातही मी त्यांच्याशी बोललो होतो. मात्र त्यांना कोणतीही पार्श्वभूमी माहिती नव्हती, असे पटेल यांनी सांगितले.

या प्रकरणातील घर पाडण्यात आले आहे. ते घर मी यापूर्वीच संबंधितांना विक्री केले होते. त्यांचा या प्रकरणात थेट किंवा निदा खान हिच्याशी संपर्क बाबत काहीही संबंध नाही. तरीही त्यांना आरोपी करण्यात आले, असेही मतीन पटेल यांनी सांगितले.

Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Nashik TCS Case : TCS धर्मांतर प्रकरणाचा 50 पानांचा अहवाल CM फडणवीसांच्या हातात, निदा खानला पाठिशी घालणाऱ्यांचे दणाणले धाबे

प्रकरणात सातत्याने इम्तियाज जलील आणि निदा खान यांचा संबंध जोडला जात होता. पोलिसांच्या ताज्या तपासात मतीन पटेल यांनी दिलेल्या माहितीने त्यावर नवा खुलासा झाला आहे. या नव्या माहितीने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com