First image of accused Nida Khan emerges after her arrest by Nashik Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणात अटक झाल्यानंतरचा निदा खानचा पहिला फोटो समोर ; चौकशीतून अनेक रहस्ये उलगडणार

Nida Khan first photo after arrest : TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतरचा तिचा पहिला फोटो समोर आला आहे. तिच्या चौकशीतून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Ganesh Sonawane

Nashik TCS religion conversion case latest update: नाशिकच्या बहुराष्ट्रीय TCS या आयटी कंपनीतील महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेली संशयित आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी (दि. 7) सायंकाळी अटक करण्यात आली.

नाशिक पोलिसांच्या पथकाने संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. अटकेवेळीचा तिचा पहिला फोटो समोर आला आहे. आतापर्यंत निदा खान सार्वजनिकरीत्या समोर आली नव्हती. त्यामुळे तिचा फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

TCS कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यामध्ये निदा खानची प्रमुख भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पंरतु गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती. एसआयटीची विविध पथके तिचा शोध घेत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ती आधी भिवंडीत लपून बसली. नंतर ती मुंब्रा येथे गेली व तिथे पतीसोबत लपून बसली. याच दरम्यान तीने कथित गर्भवती असल्याने तिथे महिला डॉक्टरकडे उपचार घेतले. त्यानंतर ती मुंबईत राहिली. तेथून तीने थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आसरा घेतला. गेल्या २० दिवसांपासून ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव येथील कैसर कॉलनीमध्ये नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये ती लपली होती. तिच्यासोबत तिचे आई-वडील, मावशी व भाऊ देखील राहत होता.

कशी केली अटक ?

निदा खान ही छत्रपती संभाजीनगर मधील काही वकिलांच्या संपर्कात होती आणि उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत होती. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून नाशिक पोलिसांना तिच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर २० पोलिसांचे पथक तैनात केले होते. हे पथक गेल्या तीन ते चार दिवसांपासून साध्या वेशात त्या परिसरात रेकी करत होते.

तिचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधला होता. महिला अधिकाऱ्यांसह २० हून अधिक पोलिस कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून तिच्यावर नजर ठेवून होते. संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी खाकी गणवेश अथवा पोलिस वाहनांचा वापर टाळला होता, जेणेकरून निदा खानला कारवाईची कुठलीही चाहूल लागू नये आणि ती पुन्हा फरार होऊ नये.

गुरुवारी पहाटेच तिला ताब्यात घेण्याचे ठरले होते. परंतु काही कारणास्तव त्यात बदल केला गेला. मुख्य संशयित असलेली निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती. तिने नाशिक रोड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र गेल्या आठवड्यात न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी ७ मे सायंकाळी संधी मिळताच निदा खान हिच्या लपून बसलेल्या ठिकाणांवर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील संयुक्त पथकाने छापा टाकून तिला ताब्यात घेतले.

नाशिकरोड न्यायालयात निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती. ती गर्भवती असल्याने तिला जामीन द्यावा, अशी विनंती तिच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. परंतु न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला होता. अटकेनंतर आज तिला नाशिक न्यायालयात हजर करण्यात येऊ शकते. त्यापूर्वी तीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तीच्या चौकशीतून या धर्मांतर प्रकरणाचे अनेक रहस्य उलगडण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT