Nida Khan Bail : TCS धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानला न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Nida Khan bail rejected : निदा खान हिने आपण गरोदर असल्याचा दावा करत आपल्याला अटक करु नये अशी विनंती वकिलांच्या माध्यमातून कोर्टाकडे केली होती. मात्र, नाशिकरोड न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला.
Nashik TCS case Nida Khan bail application update
Nashik TCS case Nida Khan bail application updateSarkarnama
Published on
Updated on

Nashik TCS Case : नाशिकच्या TCS कंपनीत घडलेलं बहुचर्चित महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणातील संशयित व फरार आरोपी निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

कंपनीची प्रोसेस असोसिएट असलेली निदा खान ही तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. पोलिसांची पथके तिच्या मागावर असून ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. असे असताना आपण गरोदर असल्याचा दावा तीने वकिलांच्या माध्यमातून केला होता.

निदा खानने वकिलांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी दि. २७ एप्रिल रोजी नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. सरकारी पक्षाने निदा खान विरोधात अनेक धक्कादायक बाबी मांडल्या होत्या. परंतु न्यायालयाने निकाल न देता तो राखीव ठेवला होता. २ मे रोजी जामिनावर निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

Nashik TCS case Nida Khan bail application update
Nashik TCS case : निदा खानने हिंदू तरुणीचे नाव 'हानिया' ठेवलं, तिला मलेशियाला..; अॅड अजय मिसरांनी कोर्टात मांडले धक्कादायक मुद्दे

अखेरीस २ मे रोजी निदा खानच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावताना नाशिकरोड कोर्टाने तिला दिलासा देण्यास नकार दिला. तिचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. सरकारी पक्षाच्या युक्तिवाद पाहाता न्यायालयाने निदा खान हिला दिलासा देण्यास नकार दिला.

निदा खानने गरोदर असल्याचा दावा करत आपल्याला अटक करु नये अशी मागणी केली होती. मात्र आता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्याने एसआयटी पथकाकडून तिचा शोध घेऊन तिला अटक करण्यासाठी हालचाली अधिक गतीमान झाल्या आहेत. याप्रकरणात निदा खान ही मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय असून तिला अटक करुन चौकशी केल्यानंतच काय ते स्पष्ट होणार आहे.

निदा खानला शोधण्यासाठी मुंब्य्रात पोलिसांनी धडक दिली होती. ती तिच्या पतीसोबत मुंब्रा येथे राहत असल्याचे कळाल्यानंतर एसआयटीच्या पथकाने तिथे छापा टाकला होता. मात्र, पोलिस तिथे पोहचण्याआधीच ती तिथून निसटली होती.

TCS कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात सात महिला व एका पुरुषाने तक्रारी दिल्या आहेत. त्यातील एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मार्च २०२६ रोजी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार व निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार या दोघांना आधीच अटक केली आहे. निदा खान ही आजूनही फरार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com