Akshay Nikalje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सुहास कांदे यांच्यावर शंभर गुन्हे, ते आमदार कसे?

सुहास कांदे यांच्यावर खंडणी, अपहरण, फसवणूक असे शंभर गुन्हे पोलिसांत दाखल आहेत.

Sampat Devgire

नाशिक : माझ्यावर साधी एऩसी देखील नाही, (Akshay Nikalje said No case in police against me) त्याला गुंड म्हणता. सुहास कांदे यांच्यावर खंडणी, अपहरण, फसवणूक असे शंभर गुन्हे (100 polce cases on suhas kande) पोलिसांत दाखल आहेत. त्यांनी आपल्या राजकारणासाठी माझी बदनामी केली. (Kande use my name for his personal politics) त्यामुळे त्यांच्यावर ५० कोटींचा चारित्र्यहननाचा दावा दाखल (I will file a defamation case against Kande) करणार आहे, असे अक्षय निकाळजे यांनी सांगितले.

भुजबळांविरोधातील केस मागे घे अशी धमकी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतन्या अक्षय निकाळजे यांनी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर केला होता. त्या निकाळजे यांनी काल नाशिक पोलिसांकडे जबाब नोंदविला. यावेळी त्यांनी आपल्या दुरध्वनीवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप सार्वजनिक करावी, अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस आयुक्त दीपक पांडे आणि पालकमंत्री यांच्याकडे केली.

यावेळी ते म्हणाले, या प्रकरणात श्री. कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात राजकारणासाठी माझ्या नावाचा वापर केला. त्यासाठी त्यांनी माझ्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार केली. हा संपुर्ण विषय छगन भुजबळ नव्हे तर घोटी टोल नाक्यावरील दादागिरी वा मारहाण हा आहे. आमदार कांदे यांचा भाऊ हा टोल नाका चालवतो. त्यात एका महिला डॉक्टर तसेच अन्य कार्यकर्त्यांना बेदम मारहान करण्यात आली. त्याची व्हिडीओ क्लीप देखील आम्ही मिळवली आहे. जे काम लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे, ते काम मी करीत आहे. आमदार कांदे यांनी माराहण व दादागिरी हे प्रकार थांबवले पाहिजेत. मात्र ते त्याला संरक्षण देत आहेत. ही किती केदाची बाब आहे.

श्री. निकाळजे म्हणाले, मी रिपब्लिकन पार्टीचा मुंबई अध्यक्ष आहे. सामाजिक काम करतो. छोटा राजन यांचा मी पुतन्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र माझ्यावर एकही गुन्हा नाही. साधी एनसी देखील दाखल नाही. तर ते मला गुंड म्हणतात. मात्र श्री. कांदे यांच्यावर मोकाची कारवाई झाल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले. त्यांच्यावर ४२०, अपहरण, खंडणी, प्राणघातक हल्ले, संघटीत गुन्हेगारी असे कितीतरी गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. शंभर गुन्हे केलेली व्यक्ती आमदार अन्‌ एकही गुन्हा न केलेली व्यक्ती गुंड हे कसे?. असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, ज्यांना मारहाण झाली ते लोक प्रचंड घाबरलेले आहेत. मात्र आता आम्ही पोलिसांत त्याचा गुन्हा दाखल करी. श्री. कांदे यांच्यावर माझी मानहानी केल्याने ५० कोटींचा दावा दाखल करी. पोलिसांनी माझ्या व श्री. कांदे यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप सार्वजनिक करावी अशी माझी मागणी आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT