Ahilyanagar District Bank Election Politics : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी एन्ट्री झाली आहे. भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव करत, सहकाराच्या राजकारणातील खासदार लंकेंची ही एन्ट्री शरद पवार राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारणात सुखावणारी अशीच आहे.
परंतु, भाजप विखे पाटील पिता-पुत्राबरोबरच काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांची डोकेदुखी वाढवणारी ठरणारी आहे. कार्यकर्त्यांबरोबर विजयाचा गुलाल उधळत असताना, खासदार लंकेंनी ज्या स्टाईलने शर्टाची काॅलर उडवली आणि दंड थोपटले यावरून, समोरच्यांनी काय समजून घ्यायचे ते समजून घ्याव, असे खासदार लंके समर्थक 'गुरगुरू' लागले आहे.
खासदार नीलेश लंकेंची (Nilesh Lanke) सहकारात एन्ट्री सोपी नव्हती. खासदार लंकेंकडे सहकारी संस्थांचे जाळे नाही किंवा कारखानदारी नाही. तरी देखील ही एन्ट्री त्यांना जेवढी सुखद आहेत, तेवढीच शरद पवार यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकाराचे राजकारण जिवंत ठेवण्याची उपयुक्त ठरले आहे, असे सहकारातील विश्लेषकांनी विश्लेषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि सहकार अशी नीलेश लंकेंची राजकीय वाटचाल राहिली आहे. या वाटचालीत त्यांना नेहमीच सहकारी बदलावा लागला आहे. त्यानंतरच त्यांना यश मिळाल्याचे दिसते. जिल्हा बँकेच्या (DCC Bank) वडणुकीत, लोकसभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नीलेश लंकेंना दिलेली साथ मिळाली नाही. त्यांना भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंबरोबर वाटाघाटी कराव्या लागल्या. बंद दाराआड चर्चा कराव्या लागल्या. यातून लंकेंनीच नाही, तर शिंदे-लंके या जोडीने चांगली वातावरण निर्मिती केली.
खासदार लंकेंना महायुतीमधील मित्रपक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेची साथ मिळाली. मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसने एकनाथ शिंदे शिवसेनेला 'सहमती'तून बाहेर ठेवले होते. एकनाथ शिंदे शिवसेनेने यावर आगपाखड केली. पण विखे पाटील-थोरातांकडून थारा न मिळाल्यावर, त्यांनी खासदार लंकेंबरोबर आघाडी करत, सहकार परिवर्तन पॅनलमधून जिल्हा बँकेच्या राजकारणात एन्ट्री मिळवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे शिवसेनेला साधे आव्हान देखील उभे करता आले नाही.
खासदार लंकेंची जिल्ह्याच्या सहकारात एन्ट्री घ्यायची होती. त्यात समोर पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी मंत्री विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचे आव्हान होतोच, तर लोकसभेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून साथ दिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील होते. जिल्हा बँक बिनविरोध व्हावी यासाठी थोरातांच्या संगमनेरमधील अमृतकुटीवर सुरूवातीला बैठक झाली होती. त्या बैठकीला खासदार लंके अनुपस्थित होते. थोरातांनी यावर शेवटपर्यंत मौन बाळगून राहिले. तसेच खासदार लंकेंनी देखील त्याचे जास्त राजकारण न करता, विजयाच्या गणिताची बेरजेला लागले. त्याचा फायदा गुलाल उधळण्यासाठी लंकेंना झाला.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मंत्री विखे पाटील यांनी, राम शिंदे आणि खासदार लंके यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. गोंधळ घालणारे लोक, असे संबोधले. पण दोघांनी अजून त्यावर प्रत्युत्तर दिलेले नाही. पण विजयाचा गुलाल उधळताना, खासदार लंकेंनी शर्टाची उडवलेली काॅलर आणि थोपटलेले दंड बरंच काही सूचकपणे, विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसला सांगून जातात, असे 'लंके पॅटर्न' राबवणारे जवळचे कार्यकर्ते खासगीत 'गुरगुरू' लागले आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे राजकारण खासदार लंकेंच्या एन्ट्रीने ढवळून निघण्याबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत आणखी वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.