Nilesh Lanke and Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke and Balasaheb Thorat : नीलेश लंके यांचे बाळासाहेब थोरातांबाबत मोठं भाकीत; 'सरकार येणार अन् थोरात...'

Nilesh Lanke Said That Balasaheb Thorat Will Be The Chief Minister : खासदार म्हणून विजय झाल्यानंतर नीलेश लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेरमध्ये भेट घेतली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सोपी नव्हती, ती बाळासाहेब थोरातांमुळे सोपी झाली.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनात नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा आमदार शरद पवार यांच्याकडे आणून घालतो, असे म्हणत धमाल उडवून देणारे खासदार नीलेश लंके यांनी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत वर्तवले.

'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, यात बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार आहेत. आमची विचार करण्याची पातळी संपायची तेथे त्यांची सुरु व्हायची. त्यामुळे बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील', असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले. खासदार लंकेंनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर त्यांच्या होम ग्राऊंडवर संगमनेरमध्ये थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदाची भाकीत वर्तवले.

नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीची खिंड काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पडद्यामागून लढवली. विशेष करून, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी त्यांची यंत्रणा मैदानात उतरवली होती. नीलेश लंके यांच्या विजयात थोरात यांचा मोठा वाटा आहे. या विजयानंतर लंके यांनी थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली. एकमेकांना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचा वर्धापनदिन नगरमध्ये झाला. नीलेश लंके यांनी नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी सत्कार झाला. नीलेश लंके यांनी यावेळी नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा विधानसभा मतदारसंघात साहेबांसाठी आमदार निवडून आणून दाखवतो. हे आमदार साहेबांकडेच घेऊन येत असतो, असे म्हणून धमाल उडवून दिली. नीलेश लंके यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मिश्लिक टिप्पणी करत स्वागत आणि शुभेच्छा दिल्या.

'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नगर जिल्ह्यात 12 जागा लढत असेल तर, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी म्हणून 12 जागा लढण्याचा निर्णय अनुभूपूर्व असून तो संगमनेर सहित असेल तर, त्याचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो', असे सुनील तटकरे यांनी म्हटले. खासदार नीलेश लंके यांनी आता बाळासाहेब थोरात यांची भेट घेत राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नीलेश लंके काय म्हणायचे आहे, हा गोंधळच आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील भेटीत, नीलेश लंके म्हणाले, "नगर दक्षिणेची उमेदवारी देण्यात आमदार थोरातांचा मोठा वाटा आहे. नीलेश लंके फार छोटा माणूस, एवढ्या मोठ्या यंत्रणेविरोधात किंगमेकर होणे सोपे नव्हते. खरे जायंट किलर थोरात साहेब आहेत. निवडणुकीत आम्ही स्क्रिनवरचे खेळाडू होतो. माझा रिमोट थोरात साहेबांकडे. माझा खांदा पक्का असल्याचे माहित असल्याने त्यांनी माझ्या खांद्यावर धनुष्य ठेवून करेक्ट निशाणा साधला. त्यामुळे बलाढ्य शक्तीपुढे सर्वसामान्य जनतेची शक्तीचा विजय झाला". राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि इथे झालेल्या घोषणा खऱ्या करीत थोरात साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

'माझ्यासाठी नगरमध्ये दुचाकीवर फिरणाऱ्या थोरातांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी झाली. मात्र त्यांनी तक्रार केली नाही. कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने परिश्रम केले. तिकडची निम्मी यंत्रणा मला मॅनेज होती. बाजीप्रभूप्रमाणे मी थोरात साहेबाच्या शब्दांवर नगर दक्षिणेची खिंड लढवली. खरे खासदार थोरात साहेब आहे', असे नीलेश लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT