Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबर 2026 पासून नाशिक येथे कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी नाशिक कुंभनगरीत देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. त्यामुळे नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.
या 9 मार्गांचा होणार विकास
१. घोटी- पहिने- त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा
२. द्वारका सर्कल - सिन्नर (आयसी २१ समृद्धी महामार्ग) - नांदूरशिंगोटे-कोल्हार
३. नाशिक ते कसारा
४ . सावळी विहीर (आयसी २० समृद्धी महामार्ग) - शिर्डी -शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
५. नाशिक ते धुळे
६. त्र्यंबकेश्वर - जव्हार - मनोर
७. सावळी विहीर - मनमाड-मालेगाव
८. घोटी- सिन्नर- वावी - शिर्डी
९. शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) - अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार काल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्वसंबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह अरुणराजे अभयसिंहराजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण, सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात. यात मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कुंभच्या काळात जी काही प्रचंड मोठी ट्रॅफिक अपेक्षित आहे. त्या ट्रॅफिक करता विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून उपलब्ध होणार असल्याने भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.