Manikrao Kokate : विषयच संपला ! माणिकरावांनी कर्जमाफीचा विषय मुख्यमंत्र्यांकडे ढकलला, अन् म्हणाले कर्ज भरायलाच पाहीजे

Manikrao Kokate shifts farm loan waiver decision to CM, says farmers must repay loans : विधानसभा निवडणुकीच्या वेळेला निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे. कर्जमाफीचा अधिकार हा मुख्यमंत्रांचा आहे. त्याचा विचार लवकरच कार्यान्वित होईल. परंतु शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे असे विधान कोकाटेंनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्द्यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळेला निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानंतर महायुतीची पुन्हा एकदा राज्यात सत्ता आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे.

कृषीमंत्री कोकाटे कोपरगाव येथे माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात त्यांना विचारले असता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात कर्जमाफीचा चेंडू लगावला. कृषी मंत्री म्हणाले, कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल. त्या संदर्भातील निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. मात्र शेतकऱ्यांनी कर्ज हे भरलच पाहीजे.

Manikrao Kokate
Nashik Politics : मैत्रीत कुस्ती ! शिवसेनेला रोखण्यासाठीच भाजपने नाशिकमध्ये घाई केली

कृषीमंत्री कोकाटे यांनी यावेळी बोगस बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीविरोधातही ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले बोगस बियाणे आणि औषधांसंदर्भात ज्या कृषीसेवा केंद्राच्या बाबतीत तक्रार दाखल होईल, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. माझ्याकडे तक्रार आली तर मी लगेच कारवाई करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

कोकाटे म्हणाले, सरकारने शेतीत भांडवली गुंतवणूक करावी ही माझी धारणा आहे. पाच वर्षात सरकार 25 हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी खर्च करणार आहे. परदेशी धर्तीवर भारतातल्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. सरकारी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.

Manikrao Kokate
Nashik News : प्रसूती वेदनेत तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला शिवसैनिक देवा सारखे धावून आले, नशेत झिंगाट असलेल्या डॉक्टरला दिला चोप

दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन त्यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर नाशिकच्या बाबतीत फार विवाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com