Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नितीन गडकरींचे गिफ्ट; नाशिक-मुंबई महामार्गाचे कॉंक्रिटीकरण!

Sampat Devgire

नाशिक : रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा नाशिक (Nashik) व ठाणेकरांच्या (Thane people) पदरात भरभरून गिफ्ट (Gift) देताना अनेक महिन्यांपासून खाच-खळग्यांमुळे शारीरीक व्याधी तसेच, वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा (Relief to traveller) दिला. नाशिक-मुंबई चार पदरी (Nashik Mumbai four lane) महामार्गाचे सहा पदरीत रुपांतर करताना संपुर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची (5000 crore fund) तरतुद केली जाणार असून, नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणले जाणार आहे.

त्याचबरोबर नाशिक रोड ते द्वारका (Nashikm road to Dwarka) या दरम्यान एलिव्हेटेड (Elivated bridge) पद्धतीच्या डबलडेकर उड्डाणपुलाची (Flyover) घोषणा करतानाच त्यासाठी सोळाशे कोटी रुपयांची (1600 crore) तरतुद केल्याचे सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ६३० किलोमीटर लांबीच्या व दोन हजार ४८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण श्री. गडकरी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ व केंद्रीय पंचायत राज्यमंत्री व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या मागणीच्या अनुषंगाने श्री. गडकरी यांनी मुंबई-नाशिक महामार्गाचे सहा पदरीकरण करण्याची घोषणा करताना नाशिक- गोंदे, वडपेपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्याची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुक केली जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच ठाणे ते वडपे रस्ता आठ पदरी करण्यासाठी आठशे कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. दोन्ही रस्ते समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहेत. पालकमंत्री भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार ॲड. माणिक कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले, ॲड. राहुल आहेर, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आदी उपस्थित होते.

एलिव्हेटेड उड्डाणपुल

नाशिक रोडच्या दत्तमंदीर चौक ते द्वारका या दरम्यान एलिव्हेटेड पद्धतीचा उड्डाणपुल उभारला जाणार असून, त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खालच्या भागात शहर वाहतुकीसाठी चार पदरी मार्ग, त्यावर अवजड वाहनांसाठी उड्डाणपुल व त्यावर आणखी एक मेट्रोसाठी उड्डाणपुल केला जाणार आहे. दोन वर्षात उड्डाणपुल तयार करण्याचे आश्‍वासन देतानाच श्री. गडकरी यांनी न्हाई व महामेट्रोमार्फत खर्च वाटून घेतला जाणार असल्याचेही नमूद केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT