त्र्यंबकेश्वर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Centre Transport minister Nitin Gadkari) रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. (He was on his personel tour) सोमवारी त्यांचा दिवस त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे खाजगी दौऱ्यासाठी राखीव होता. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे पूजा (He pay his worship) केली. स्वतः गडकरी आपल्या साधेपणासाठी परिचीत आहेत. त्यांमुळे त्यांच्या दौऱ्याची फारसी चर्चाही नव्हती. मात्र प्रशासनाने त्याचा एव्हढा बाऊ केला की, सुरक्षेच्या करणाने प्रशासनाने शहरातील दुकाने काही काळ बंद ठेवले. (Shop & other activities kept close due to Gadkari visit) पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला. त्यामुळे स्थानिकांत सोमवारचा दिवस `थांबा, नितीन गडकरी यांची पूजा सुरु आहे` अशा चर्चेत गेला.
सोमवारी श्री. गडकरी यांनी पूजा केली. हा त्यांचा खासगी दौरा होता. पूजा व दर्शनासाठी येथे श्री. गडकरी येत आहेत, असे समजतात शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला. प्रथम त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत आहे, असे सांगण्यात आल्यावर खबरदारी म्हणून त्या भागातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. मात्र, थोड्याच काळात मंदिरात येणार नसून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी त्यांची खासगी पूजा असल्याचे सांगितल्यावर सर्व बंदोबस्त तेली गल्ली भागातील गोकुळदास लेनमध्ये हलविण्यात आला. तेथील गायधनी यांच्या घरी श्री. गडकरी यांनी पूजा केली. पाच तास त्यांनी तेथे व्यतीत केले.
हा त्यांचा खासगी दौरा असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. पूजा झाल्यावर अरुंद बोळातून श्री. गडकरी यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडून मार्गस्थ झाला. त्यामुळे परिसरातील लोकांना हायसे वाटले. कारण या भागातील रहिवाशांना त्यांच्या घरात जाण्यासाठी मज्जाव केला होता. सोमवार असल्याने आलेल्या भाविकांची बंदोबस्तामुळे भंबेरी उडाली.
त्यानंतर त्यांनी स्वामी समर्थ केंद्र येथे आण्णासाहेब मोरे यांच्या केंद्रालाही भेट दिली. त्यांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी श्री. मोरे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. आमदार सीमाताई हिरे यावेळी उपस्थित होत्या.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.