JP Gavit & Nitin Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitin Pawar Won: नितीन पवारच ठरले उजवे, डाव्या आघाडीचे जेपी गावित पराभूत

Nitin Pawar Won; CPM leader JP Gavit lost Kalwan-surgana seat twice against NCP MLA Nitin Pawar-आमदार नितीन पवार यांनी सर्व अफवांना खोटे ठरवत डाव्या आघाडीला रोखत आठ हजारांच्या मताधिक्याने कळवणचा गड राखला

Sampat Devgire

Nitin Pawar Won: अत्यंत चुरशीच्या झालेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आणदार नितीन पवार यांनी आपला पारंपारीक गड राखला. शेवटपर्यंत झुंज देत त्यांनी आठ हजारांच्या मताधिक्याने डाव्या आघाडीचे नेते जे. पी. गावीत यांचा पराभव केला.

आज झालेल्या मतमोजणीत आमदार नितीन पवार यांना एक लाख एकोणीस हजार १९१ मते मिळाली. महाविकास आघाडी पुरस्कृत माकपचे माकपचे जे. पी. गावीत यांना एक लाख दहा हजार ७५९ मते मिळाली. उर्वरीत सर्व उमेदवारांकडे मतदारांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या लढतीची पुनरावृत्ती यंदा झाली. त्यात फरक एवढाच की यंदा माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या पाठीशी शरद पवार यांनी आपली ताकद उभी केली होती. महाविकास आघाडीने हा मतदार संघ माकपला सोडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नितीन पवार यांना आपली जागा राखण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले.

या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार हे 6596 मतांनी विजयी झाले होते. त्यांना जे. पी. गावित यांनी आव्हान दिले होते. यंदाच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यामुळे शरद पवार यांचा गट आणि गेल्या निवडणुकीत 23 हजार मते मिळवलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद जे. पी. गावित यांच्या मागे उभी होती. त्यामुळे आमदार नितीन पवार यांना खूप परिश्रम घ्यावे लागले.

या मतदारसंघात प्रभाकर पवार आणि रमेश थोरात या दोन अन्य उमेदवारांमुळे चौरंगी लढत होईल असे वाटत होते. मात्र ते अयशस्वी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती. मात्र विधानसभेला फासे उलटे पडले.

आदिवासींच्या वन्य जमिनीचा प्रश्न या मतदारसंघात प्रमुख होता. या प्रश्नावर जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई लॉंग मार्च दोन वेळा काढण्यात आला. या विषयावर त्यांनी दीर्घकाळ लढा दिला आहे. सिंचनाचा प्रश्न आणि आदिवासी मतदारसंघाचा दळणवळण व अन्य समस्या प्रमुख होत्या. आमदार पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आणि मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्यात यश आल्याने त्याचा प्रचार केला. त्यात लाडकी बहिण निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.

जेपी गावित यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेतली. आमदार नितीन पवार यांच्यासाठी धनंजय मुंडे यांची सभा झाली. शरद पवार यांच्या सभेचा चांगला परिणाम होईल असे वाटत होते. मात्र महायुतीच्या बाजुने वाहणारे वारे आमदार नितीन पवार यांना विजयाकडे घेऊन गेली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT