Rajendra Bagul & Nitesh Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitish Rane Politics: ‘मल्हार’ प्रमाणपत्राचा विषय मंत्री नितेश राणेंवरच बुमरँग!

Nitish Rane; Hindu Khatik community refuse Nitesh Rane advice on Mutton business-मंत्री नितेश राणे यांना मटन विक्रीच्या प्रश्नावर राज्यातील खाटीक समाजाने आणले अडचणीत

Sampat Devgire

Nitesh Rane Politics: मंत्री नितेश राणे सातत्याने आक्रमक विधाने करून चर्चेत राहतात. सध्या मटण विक्रेत्यांना ‘मल्हार’ प्रमाणपत्र देण्याबाबत त्यांनी विधान केले होते. या विधानावरून ते चांगलेच तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.

मंत्री नितेश राणे हिंदू आणि मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण आवर सातत्याने भर देत आले आहेत. यावरून विरोधकांनी त्यांना अनेकदा टिकेचे लक्ष्य देखील केले. त्यांच्या या वक्तव्यांवरून भारतीय जनता पक्षात देखील पडसाद उमटले आहेत. मात्र वरिष्ठांचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन असल्याने मंत्री राणे थांबण्याची कोणतिही चिन्हे नव्हती.

सध्या मात्र झटका आणि हलाल मटन विक्रीवरून त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या विधानावरून त्यांना घरचा आहेर मिळाला आहे. एकंदरच हे विधान त्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील हिंदू खाटीक समाजाने मंत्री नितेश राणे यांनी राजकारणासाठी हा विषय हाताळू नये. मटन हा व्यवसायाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी मंत्री राणे यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. नाशिक शहरात आणि राज्यात शेकडो वर्ष हलाल मटन खाण्याची आणि विक्री करण्याची प्रथा आहे. हा एक व्यवसाय आहे. त्याचा कुठलाही अनुभव नसताना मंत्री राणे यांनी त्यात पडायला नको होते.

खाटीक समाजाने काय करावे. काय करू नये. कोणी काय खावे. काय खाऊ नये. यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मंत्री राणे यांना कोणी दिला? असा प्रश्न त्यांनी केला. मंत्री राणे हे कशा प्रकारचे राजकारण करतात, हे सबंध महाराष्ट्राला माहित आहे. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही.

यंदाही खाटीक समाजाने त्यांना गांभीर्याने घेतलेले नाही. राज्यात कोणीही ‘मल्हार’ प्रमाणपत्र स्वीकारणार नाही. आम्ही आमचा व्यवसाय परंपरेनुसारच सुरू ठेवणार आहोत. असे सांगत त्यांनी मंत्री राणे यांच्या राजकारणाला सणसणीत चपराक दिली आहे. त्यामुळे या विषयावरून नितेश राणे महाराष्ट्रभर तोंडघशी पडणार हे स्पष्ट झाले आहे.

याबाबत श्री बागुल म्हणाले, नाशिक शहरात ७५ टक्के दूध हे कोकणी समाजाचे येते. त्यात व्यावसायिक मुस्लिम तर दूध काढणारे हिंदू आहेत. तसेच मटन व्यवसायात देखील आहे. मंत्री राणे यांना हिंदू समाजाचे नुकसान करायचे आहे का हिंदू समाजाच्या व्यवसायावर संक्रात आणायचे आहे का? मंत्री राणे यांनी त्यांचे राजकारण करावे. परंतु व्यवसायिकांना व्यवसाय कसा करावा, हे सल्ले देण्याचे धाडस थांबवावे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT