Gulabrao Patil: भाजप, राष्ट्रवादी नव्हे तर जयंतराव आमच्याकडे येणार; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्यानं खळबळ

Minister Gulabrao Patil Claims Jayant Patil Will Join Shiv Sena: 'माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,' असे वक्तव्य जयंतराव पाटलांनी तीन दिवसापूर्वी मुंबईत केले आहे.त्यांच्या भाषणातील एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
 Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon, 16 March 2025: शरद पवार यांचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पवारांची साथ सोडतील, अशा बातम्या गेल्या अनेक दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत. खुद्द जयंतरावांनीही अप्रत्यक्षपणे दिलेले संकेत यावरुन जयंतरावाच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजणे अवघड आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना आता शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं जयंतराव शिवसेनेत येतील, असा दावा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. जयंतरावाबाबत गुलाबरावांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. जयंतरावांनी अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास ऑफर यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे जयंतराव कोणत्या पक्षात प्रवेश करणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

'माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,' असे वक्तव्य जयंतराव पाटलांनी तीन दिवसापूर्वी मुंबईत केले आहे.त्यांच्या भाषणातील एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जयंत पाटलांच्या या विधानाचा नेमका रोख काय? असा सवाल केला जात आहे. ते शरद पवारांची साथ सोडणार की काय, अशी शंका यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

 Jayant Patil
Karnataka KTPP Act : सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? भाजपचा हल्लाबोल; 'अशा छोट्या मुद्द्यांमुळेच भारताचे विभाजन'

जयंत पाटील यांच्या वागणुकीवरुन पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही काहीसे संभ्रमात असावेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी नुकतीच बारामतीत जाऊन शरद पवार यांना स्पष्टीकरण दिले असल्याचे बोलले जाते. धुळवडीदिवशीच (14 मार्च) जयंत पाटील यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. ही भेट स्पष्टीकरण देण्यासाठीच असल्याचे सांगितले जाते.

पाटील यांना भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेशासंबंधीच्या चर्चांवर प्रश्न पत्राकाराने विचारले. त्यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडण केले आणि आपण शरद पवार यांची साथ सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते बनले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत त्यांचे महत्व काहीसे कमी झाले आहे. त्यांची राजकीय कोंडी होत असल्याचे समजते. यामुळे त्यांनी काही कार्यक्रमांमध्ये “माझी गॅरंटी घेऊ नका” असे विधान केले असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com