Nashik potholes sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NMC Politics: खड्ड्यांमुळे चौघांचा बळी; आता मनसेचा थेट आरोप, 'टक्केवारी'मुळेच नाशिकच्या रस्त्यांची दुर्दशा?

Nashik potholes: नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेने रस्ते कामातील टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महापालिकेत आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

Sampat Devgire

Nashik News: नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तीव्र बनला होता. मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. अपघातात चौघांचा बळी गेल्यावर आता सगळे खडबडून जागे झाले आहेत. खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका कार्यालयात धरणे धरले. आयुक्त आणि महापौर कार्यालयात आंदोलन केले. रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. त्यानंतर सगळीच यंत्रणा जागी झाल्याचे चित्र आहे.

या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच सगळ्यात आधी शासनाला आणि महापालिकेला घरचा आहेर दिला. नाशिक शहर वाऱ्यावर सोडू नका. जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.

मंत्री भुजबळ यांनी इशारा देतच काही तासांतच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक शहरात दाखल झाले. त्यामुळे सत्ताधारी भाजपची चांगलेच धावपळ उडाली. महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी अपघातात निधन झालेल्या कोतकर कुटुंबीयांची भेट घेतली.

कालपर्यंत तोंडावर बोट ठेवून असलेल्या भाजप नगरसेवकांचाही संताप व्यक्त झाला. सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही या प्रश्नावर आवाज उठवला. सत्ताधारीच आंदोलनाच्या भूमिकेत आल्याने नागरिकांचाही गोंधळ झाला.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहराचा दौरा करीत पॅचअप केले. निधन झालेल्या कोतकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. महापालिकेत बैठक घेतली. खड्डे बुजविण्याचे आदेश दिले.

यामध्ये बैठक सुरू असतानाच मनसेच्या जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आणि शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत आंदोलन झाले. यावेळी मनसेच्या नेत्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. टक्केवारी आणि भ्रष्टाचार यामुळे दुरावस्था झाली आहे. त्यावर काय उपाय करणार असा प्रश्न मंत्री आणि आयुक्तांना केला.

नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तीव्र बनला आहे. समाज माध्यमांवर त्याबाबत संताप व्यक्त होत आहे. आता नागरिकांनी कालिका मंदिर येथे आज सायंकाळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाशिक शहर खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

  • नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक; महापालिकेत आंदोलन करत रस्ते कामातील 'टक्केवारी'चा मुद्दा उपस्थित.

  • जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मंत्री गिरीश महाजन व प्रशासनाला भ्रष्टाचाराबाबत थेट जाब विचारला.

  • खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याने नागरिकांमध्ये संताप; रस्ते दुरुस्तीबरोबरच भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT