Headmaster Promotion: TET नसतानाही मुख्याध्यापकपदाचा मार्ग मोकळा! 3 सप्टेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा

Bombay HighCourt on Teacher Promotion NO TET Required:3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET शिवाय मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा राज्यातील हजारो शिक्षकांना लाभ मिळणार
Bombay HighCourt on Teacher Promotion NO TET Required
Bombay HighCourt on Teacher Promotion NO TET RequiredAI
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसल्यामुळे मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती नाकारण्यात आलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे.

3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET पास असणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करत, त्यांच्या नियुक्तीच्या तारखेची पडताळणी करून चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने सातारा जिल्हा परिषदेला दिले आहेत. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव आणि नंदेश एस. देशपांडे यांच्या खंडपीठाने 29 जुलै 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

16 शिक्षकांनी दाखल केली होती याचिका

रामदास शामराव सोलास्कर आणि अन्य 15 शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक पदासाठी पदोन्नती मिळण्यास केवळ TET परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे कारण देत अपात्र ठरविण्यात आले होते.

याचिकाकर्त्यांचा दावा होता की, त्यांची नियुक्ती 3 सप्टेंबर 2001 पूर्वी झाली असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना TET मधून सूट मिळते. त्यामुळे केवळ TET नसल्याच्या कारणावरून पदोन्नती नाकारणे बेकायदेशीर आहे.

नियुक्तीच्या तारखेची पडताळणी करण्याचे आदेश

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, संबंधित शिक्षकांच्या नियुक्तीच्या तारखा संबंधित कागदपत्रांच्या आधारे स्वतंत्रपणे तपासाव्यात. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी करून संबंधित शिक्षकांचा हक्क निश्चित करावा आणि चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हा परिषद, साताराला देण्यात आले.

Bombay HighCourt on Teacher Promotion NO TET Required
Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! जुनी पेन्शन लागू; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार

न्यायालयाने Anjuman-E-Taleem Trust विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. त्या निर्णयातील परिच्छेद 168 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, 3 सप्टेंबर 2001 पूर्वी लागू भरती नियमांनुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET पात्रतेतून सूट आहे. मात्र त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET पात्रता आवश्यक राहील.

याच आधारावर उच्च न्यायालयाने म्हटले की, जर संबंधित शिक्षकांची नियुक्ती 3 सप्टेंबर 2001 पूर्वीची असल्याचे पडताळणीत सिद्ध झाले, तर त्यांना TET नसल्याच्या कारणावरून मुख्याध्यापक पदासाठी अपात्र ठरवता येणार नाही.

Bombay HighCourt on Teacher Promotion NO TET Required
DA Hike: सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 5% वाढ; ओडिशा सरकारचा मोठा निर्णय

याचिका मंजूर

न्यायालयाने याचिका अंशतः मंजूर करत जिल्हा परिषदेला नियुक्तीची तारीख तपासून त्यानुसार योग्य आदेश काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे 3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांसाठी मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

1 सप्टेंबर 2025 च्या निर्णयाचा आधार

मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली TET/CTET परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून सातारा जिल्ह्यातील अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांचा पदोन्नती यादीत समावेश करण्यात आला नव्हता. या निर्णयाला आव्हान देत चंद्रकांत यादव, रामदास सोळसकर यांच्यासह इतर सेवाज्येष्ठ शिक्षकांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश पाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने 'Anjuman-E-Taleem Trust विरुद्ध महाराष्ट्र राज्य' प्रकरणात दिलेल्या 1 सप्टेंबर 2025 च्या निर्णयाचा आधार घेत, 3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियमानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET/CTET पात्रतेतून सूट असल्याचे स्पष्ट केले.

या निर्णयाचा कुणाला फायदा

  • 3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियुक्त शिक्षकांना मोठा दिलासा.

  • TET नसल्याच्या एकमेव कारणावरून पदोन्नती नाकारता येणार नाही.

  • नियुक्तीच्या तारखेची अधिकृत पडताळणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय.

  • राज्यातील अशाच स्वरूपाच्या अनेक प्रकरणांवर या आदेशाचा परिणाम होण्याची शक्यता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com