उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela : शेतकरी उध्वस्त, आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले होणार बेघर!

Kumbh Mela 2025 Maharashtra farmer crisis : एनएमआरडीए च्या कारवाईचा हातोडा निराधार मुलांच्या आश्रमावरही पडणार

Sampat Devgire

Farmers agitation News: एनएमआरडीए च्या कारवाई विरोधात साखळी उपोषणाला वाढता प्रतिसाद आहे. मात्र प्रशासन कारवाईवर ठाम आहे. आता कारवाईच्या भीतीने शेतकरी संघटित होत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत 100 मीटर क्षेत्र मोकळे केले जात आहे. त्यामुळे पाचशेहून अधिक बांधकामे बाधित होत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.

एनएमआरडीएच्या या कारवाई विरोधात कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा आहे. मात्र प्रशासन याबाबत नकारात्मक भूमिका सोडण्यास तयार नाही. या कारवाईने शेकडो शेतकरी स्वतःच्याच जमिनीत निराधार आणि स्वतःच्याच घरातून बेघर झाले आहेत. कोणताही मोबदला न देता 560 हून अधिक इमारतींना त्याची झळ बसली. आता एनएमआरडीए च्या कारवाईचा हातोडा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आश्रमावरही होणार आहे.

त्र्यंबक रस्त्यावरील तळवाडे फाटा येथे गेल्या बारा वर्षांपासून आधारतीर्थ आश्रम सुरू आहे. यामध्ये राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले निवासी शिक्षण घेतात. मात्र एनएमआरडीए कडून ही वास्तूही पाडली जाणार आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ही मुले ही साखळी उपोषण स्थळी बसून आहेत.

दरम्यान शेतकरी कृती समितीचे ॲड तानाजी जायभावे, ॲड प्रभाकर खराटे, उत्तमराव खांडबहाले, भाऊसाहेब खांडबहाले, गोकुळ खांडबहाले, रवी दोंद, ॲड अरुण खांडबहाले, ॲड बाळासाहेब रहाडे, नवनाथ कांडेकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्त यांची भेट घेतली. अन्यायकारक कारवाई थांबवावी अशी विनंती केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची सूचना केली.

दरम्यान विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी या आंदोलनासाठी आमदार हिरामण खोसकर आणि दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT