Dhangekar criticizes BJP leader: टीका करायला मर्द भेटत नाही, आता यांना बुरखे घालून पळायला लावतो; धंगेकरांची भाजप नेत्यावर गंभीर टीका

Politcal News : धर्मदाय आयुक्त आणि बिल्डर-राजकारणी यांच्यातील लागेबांधे याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात चतुशृंगी पोलीस ठाण्यात जात या प्रकरणाची नीट चौकशी करण्याची मागणी करणार केली आहे. धर्मदाय आयुक्त आणि बिल्डर-राजकारणी यांच्यातील लागेबांधे याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले, 'धर्मदाय आयुक्तालयात अनेक वर्षे प्रकरणे पेंडिंग राहतात, पण जैन बोर्डीग जमीन प्रकरणात लगेच कारवाई का करण्यात आली ? असा सवाल धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उपस्थित केला आहे. धर्मदाय आयुक्त एवढे फास्ट कधीच निर्णय देत नाहीत, मग या प्रकरणात कसा घेतला असे देखील प्रश्न विचारला आहे.

Ravindra Dhangekar
BJP Janata Darbar : भर जनता दरबारात नारायण राणे भडकले? भाजप पदाधिकाऱ्यांचे थेट कानच टोचले

पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कोणाचेही नाव लिहिणार नाही, पण या प्रकरणांमध्ये कोण कोण आहेत ही माहिती हवी असेल तर पोलिसांनी गोखले बिल्डरला विचारणा करणे आवश्यक असल्याचा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Ravindra Dhangekar
MVA Meeting : राहुल गांधी व्होटचोरीवर जीव तोडून भांडतायत... पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना बैठकीसाठी वेळ मिळेना; सपकाळांची सलग तिसऱ्या बैठकीला दांडी

भाजप (BJP) नेत्यांवर करण्यात येणाऱ्या टिके बाबत विचारले असता धंगेकर म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी थोडं थांबायला सांगितलं आहे. मात्र पोल खोल तर व्हायलाच पाहिजे याबाबत मोठ्या प्रमाणात माझ्याकडे पुरावे आहेत, मात्र, यावर नंतर बोलेन. गुन्हेगारीवर बोललच पाहिजे. कारण शहरात 70 टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होत असून पुणेकरांच्या प्रश्नांनवर बोलत राहणार. त्यावर नाही बोललो तर ती पिढी मला माफ करणार नाही, असेही धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar
MVA march : मतचोरी विरोधात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; मोर्चा किती वाजता निघणार? मार्ग काय असणार? नेत्यांनी सगळेच सांगितले

माझ्याकडे राजकीय विषय भरपूर आहेत. राजकीय पटलावरती कोणी आले तरी आपण कमी पडणार नाही. मात्र त्यासाठी कुणीतरी मर्द भेटला पाहिजे. मला आरोप करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणी मर्द भेटलेला नाही. त्यांच्या औकातीवर मला जायचंय, पण थोडे दिवस जाऊ द्या सगळ्यांची औकात काढतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Ravindra Dhangekar
Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पहिला संघर्ष, सांगलीत महायुतीसोबत दुसरा मुकाबला

मी कोणाच्या कुटुंबावर जात नाही, मला चांगली शिकवण आहे, तुम्ही माझ्या कुटुंबावर आरोप का ? करत आहेत. त्यामुळे मी जेव्हा टीका करेल तेव्हा सगळ्यांना पुण्यामध्ये बुरखा घालून पळावे लागेल, असे म्हणत धंगेकर यांनी सत्ताधाऱींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

Ravindra Dhangekar
MVA Meeting : राहुल गांधी व्होटचोरीवर जीव तोडून भांडतायत... पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना बैठकीसाठी वेळ मिळेना; सपकाळांची सलग तिसऱ्या बैठकीला दांडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com